Shraddha Kapoor love life News, Shraddha Kapoor breakup with Rohan Shrestha Latest News Updates Dainik Gomantak
मनोरंजन

रोहन-श्रद्धा कपूरने केला 4 वर्षाच्या प्रेमाचा 'द एंड'

श्रद्धा कपूर लव रंजनच्या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. हे दोघे 4 वर्षे एकत्र होते. मात्र, आता ते वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत. (Shraddha Kapoor love life News)

श्रद्धा कपूरचे ब्रेकअप!
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गोव्यात (Goa) श्रद्धा कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रोहनने हजेरी लावली नसल्याची चर्चा आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, मागच्यावर्षी त्यांच्यात मतभेद सुरू झाले होते. परिणामी फेब्रुवारीमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती समोर येत आहे.

रोहन आणि श्रद्धा हे बालपणीचे मित्र आहेत
असेही बोलले जात आहे की, श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) कुटुंबाला रोहन खूप आवडतो. श्रद्धा कपूर आणि रोहन हे बालपणीचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबातही एकमेकांशी चांगले नाते आहे. श्रद्धा आणि रोहन गेल्या 4 वर्षांपासून डेट करत होते. दोघे अनेकदा डिनर डेटवर एकत्र दिसले आहेत. इंटरनेटवर त्यांच्या लग्नाच्या (Marriage) बातम्याही आल्या होत्या. ब्रेकअपच्या बातमीवर दोघांपैकी कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Shraddha Kapoor breakup with Rohan Shrestha)

श्रद्धा कपूर लव रंजनच्या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. पुढे श्रद्धा पंकज पाराशर यांच्या 'चालबाज इन लंडन' या चित्रपटातही झळकणार आहे. श्रद्धा कपूर शेवटची बागी 3 या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT