Raj Kundra - Shilpa Shetty orgnize deewali party  Dainik Gomantak
मनोरंजन

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीला बी टाऊनच्या स्टार्सची हजेरी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या घरी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीला बॉलीवूडचे अनेक स्टार्स हजर होते.

Rahul sadolikar

Shilpa Shetty's deewali party : देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. बॉलिवूड स्टार्सही सध्या दिवाळी साजरी करत आहेत. रमेश तौरानी, ​​मनीष मल्होत्रा ​​आणि एकता कपूर यांच्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी काल रात्री दिवाळी पार्टी साजरी करण्यात आली.

अनेक स्टार्सची हजेरी

 शिल्पाच्या दिवाळी पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पार्टीदरम्यान शिल्पा सर्वांसमोर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यावेळी अभिनेत्री लाल रंगाच्या पोशाखात आणि हातात स्कार्फमध्ये पोहोचली. 

यावेळी शिल्पा खूपच सुंदर दिसत होती. शिल्पाच्या पार्टीत बी-टाऊनचे स्टार्स वेगवेगळ्या लूकमध्ये दिसले, ज्यात शाहिद कपूर, मीरा राजपूत, श्रद्धा कपूर, नुसरत भरूचा, सुष्मिता सेन आणि इतर अनेक दिग्गज होते.

श्रद्धा कपूर

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 11 नोव्हेंबरला त्यांच्या घरी ग्रँड दिवाळी पार्टी आयोजित केली होती. यावेळी हे जोडपे हलकेसे हसत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसले. 
यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली. पार्टीमध्ये श्रद्धा पोहोचताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या, अभिनेत्री निळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.  

रवीनासोबत राशाही

यावेळी अभिनेत्री रवीना टंडन तिची मुलगी राशा थडानीसोबत दिसली. आई-मुलगी ही जोडी जबरदस्त आकर्षक दिसत होती. लाल रंगाच्या कपड्यात राशा खूपच सुंदर दिसत होती. लाल साडीत आईसोबत आलेल्या राशाकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. तर रवीना लेमन कलरच्या पोशाखात दिसली.

तमन्ना भाटियाही उपस्थित

शाहीद कपूर आणि मीरा राजपूत सोबत, सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल देखील पार्टीत उपस्थित होते, ते सर्व पारंपारिक पोशाखात जबरदस्त दिसत होते. 
या दिवाळी पार्टीत अभिनेत्री तमन्ना भाटियानेही हजेरी लावली होती. निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.  

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT