Kabhi Eid Kabhi Diwali|shehnaaz gill  Dainik Gomantak
मनोरंजन

'कभी ईद कभी दिवाली' सेटवरून शहनाजचा बालकलाकारासह फोटो व्हायरल

Kabhi Eid Kabhi Diwali: शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटातुन रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

दैनिक गोमन्तक

सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित 'कभी ईद कभी दिवाळी' (Kabhi Eid Kabhi Diwali) हा चित्रपट सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध कलाकारांची भर पडल्याने तो आणखी चर्चेत आला आहे. शहनाज गिल देखील या चित्रपटात दिसणार आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या सेटवरून तिचा एक फोटो सोशल मिडीयावर आला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शहनाज गिल एका लहान मुलीसोबत दिसत आहे. (Kabhi Eid Kabhi Diwali shehnaaz gill new photo news)

शहनाज गिल (Shehnaaz Gill) अलीकडेच 'हौंसला रख' या पंजाबी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामधील तिचे काम लोकांना खूप आवडले होते. सलमानचा चित्रपट हा शहनाजसाठी मोठा प्रोजेक्ट आहे. तीचे काम मोठ्या पडद्यावर पसंद पडते का पाहणे रंजक ठरेल. शहनाज गिलच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल चाहत्यांनाही खूप उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झालेल्या फोटोमध्ये (Photo) शहनाज खुर्चीवर बसलेली असून तिने एका बालकलाकारालासह दिसत आहे. शहनाजच्या या फोटोवर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शहनाज गिल 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात (Movie) जस्सी गिलसोबत दिसणार आहे. मात्र, यापूर्वी अशीही बातमी आली होती की, शहनाज नाही तर जस्सी गिलसोबत श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी दिसणार आहे. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao Lairai Jatra: लईराई देवीची जत्रा निर्विघ्न पार पडणार! सुरक्षेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना; सरकारनं कसली कंबर

Goa Weather: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 35 अंशांच्या पार जाणार; वेधशाळेनं दिला 'हा' मोठा इशारा

Bicholim: चित्रविचित्र मुखवटे, पिचकाऱ्या अन्‌ रंगांची आरास; शिमग्याच्या साहित्याने डिचोली बाजार फुलला, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

Goa Pollution: गोव्यातील प्रदूषण चाचणी यंत्रणा कोलमडली, पर्यावरण तज्ज्ञांकडून नाराजी; व्यवस्थापनाचा अभाव, प्रमुख शहरांत चाचणी यंत्रणाच नाही

Canacona Municipal Fish Market: काणकोण पालिका मासळी मार्केटात दुर्गंधीचे साम्राज्य, प्लास्टिकचा खच; प्रसाधनगृहाची वानवा

SCROLL FOR NEXT