Sharukh Khan Son Aryan Khan Case  Dainik Gomantak
मनोरंजन

'लेकाच्या पराक्रमामुळे' सुपरस्टारची झाली अशी दयनीय अवस्था..

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB कडून अटक करण्यात आली होती, दरम्यान शर्तीचे प्रयत्न करूनही आर्यन खानची सुटका होत नाही आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचं (Sharukh Khan) नाव घेतलं की समोर येतोय तो त्याचा किलर लुक त्याची स्टाईल, त्याचा अॅटीट्यूड; पण काही दिवसांपूर्वी त्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Case) याला NCB कडून अटक करण्यात आली होती, शर्तीचे प्रयत्न करूनही आर्यन खानची सुटका होईना, मुलाच्या पराक्रमाने बापाची झालेली अवस्था चाहत्यांना बघवत नाहीये. शाहरुख खानच्या या अवस्थेवर अनेक स्तरतून कॉमेंट येत आहेत, सलमान खानच्या कुटुंबाने देखील आर्यन खान साठी प्रार्थना केली.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही दिवसांपूर्वी NCB कडून अटक करण्यात आली होती, बॉलीवूड स्टारचा मुलगा असून देखील त्याला आजूनही जमीन मिळाली नाही. आर्यन खानने अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळला होता, आज मुंबई उच्च न्यायालयात त्याची सुनावणी झाली. दरम्यान कालही त्याचा जमीन अर्ज फेटाळण्यात अला होता.

2 ऑक्टोबर रोजी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (NCB) क्रूझ शिपवर छापे मारले दरम्यान आर्यन खानला ताब्यात घेतले तेव्हापासून तो चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान शाहरुख खानच्या मुलाने अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु सत्र न्यायालयाने तो वळोवेळी फेटाळला. काल मुंबई उच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी झाली. तसेच आजही या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

या स्टार किडने प्रथम 4 ऑक्टोबर रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर 8 ऑक्टोबर तसेच 20 ऑक्टोबर रोजी जामीन सुनावणीनंतर त्याला जामीन नाकारण्यात आला होता. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी आज शाहरुखच्या मुलाच्या खटल्यात युक्तिवाद करत होते. आता आलेल्या वृत्तांनुसार, आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी एका दिवसाने वाढवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्याच्या जामिनासाठीची सुनावणी आज 27 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. आज दुपारी 2.30 वाजता पुन्हा सुनावणी सुरू होईल.

चर्चेत असलेला विषय आजच्या जामीन सुनावणीच्या युक्तिवादात मुकुल रोहतगी यांनी असा युक्तिवाद केला की आर्यन खान हा “तरुण” होता, त्याला तुरुंगात ठेवण्यापेक्षा पुनर्वसनासाठी पाठवले पाहिजे. 23 वर्षीय स्टार किडला क्रूझ शिपवर छापे टाकताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी 3 ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली तेव्हापासून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला 8 ऑक्टोबर रोजी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले होते. खानच्या वकिलांनी वारंवार असा युक्तिवाद केला आहे की त्याच्याकडे कोणतेही औषध सापडले नाही. गेल्या आठवड्यात त्याला जामीन नाकारणाऱ्या विशेष अंमली पदार्थ विरोधी न्यायालयाने सांगितले की त्याला त्याचा मित्र अरबाज मर्चंटच्या बुटात लपवलेल्या चरसबद्दल माहिती होती. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर अनेकांना अटक केलेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीने 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि 5 ग्रॅम मेफेड्रोन आणि 1.3 लाख रुपयांहून अधिक रोख जप्त केल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT