Shantit Kranti Trailer Sony Live
मनोरंजन

Shantit Kranti Trailer: गोवा रोड ट्रिपची धमाकेदार कहाणी

Shantit Kranti मध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन (श्रेयस), ललित प्रभाकर (प्रसन्न) आणि आलोक राजवाडे (दिनार) आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबई : कधी-कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी नीट करण्यासाठी आपल्या जवळच्या मित्रांसोबत एक रोड ट्रिप करणे गरजेचे असते. उत्तम, विचारप्रवर्तक कन्टेंटसोबत प्रादेशिक घटकांवर भर देत असताना सोनी लाईव्हने (Sony Live) आपल्या आगामी मराठी ओरिजिनल- ‘शांतीत क्रांती’चा ट्रेलर (Shantit Kranti Trailer) रिलीज केला आहे. त्यातून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध आपल्याला कसा घेता येईल. हे दिखविले आहे. ही कहानी आहे श्रेयस, प्रसन्न आणि दिनार या 3 बेस्ट फ्रेंड्सची. ‘शांतीत क्रांती’ (Shantit Kranti)ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या एका रोड ट्रिपची गोष्ट आहे. (Shantit Kranti: Interesting Story of Goa road trip)

त्यांच्या अयुष्यातील एक साधी रोड ट्रिप मोठे बदल घडवून आणते. या रोड ट्रीपमुळे त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यात कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची चांगली संधी मिळते. ‘शांतीत क्रांती’ ही म्हण शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून, या शोमध्ये खुप चांगल्या पद्धतीने 3 मित्रांच्या मैत्रीतील नात्याचे सुंदर चित्रण दाखवले आहे. हे चित्रण अत्यंत अर्थपूर्ण आणि धमाल असून प्रेक्षकांशी लगेच जोडले जाणारे आहे.

हा असणार भाडिपाचा नवा शो!

भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या मराठी साहित्याच्या पेजचे संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांनी या शोचे दिग्दर्शन केले आहे. या शोमध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन (श्रेयस), ललित प्रभाकर (प्रसन्न) आणि आलोक राजवाडे (दिनार) आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या शोमध्ये शिखा तलसानिया मराठीत चित्रपट सृष्टीत प्रथमच एंट्री करणार असून, ती या शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘शांतीत क्रांती’ ही कहाणी फक्त तीन जवळच्या मित्रांची कथा नाही, तर या तीन मित्रांनी घेतलेला स्वतःचा शोध आणि ओळख या दिशेने या तीघांनी केलेला एक प्रवास आहे. आश्चर्यकारक, हास्याच्या उकळ्या फुटणारे क्षण, रस्त्यातील अनुभव, दिलखेचक संवाद आणि प्रेक्षकांनी ताल धरायला लावणारे रॅप म्युझीक यामुळे हा शो नक्कीच प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करणार असे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT