Shahrukh khan Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan's Budget : शाहरुखच्या जवानमध्ये नाचणार 1 हजार डान्सर, चित्रपटाचं बजेट ऐकून चक्रावून जाल...

अभिनेता शाहरुख खानच्या आगामी जवानच्या बजेटचा आकडा भलताच मोठा आहे.जवानच्या निर्मितीचा खर्च प्रचंड आहे.

Rahul sadolikar

पठाननंतर शाहरुख खानच्या आगामी जवान चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाणला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं सहाशे कोटींहून अधिक कमाई केली होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मात्र प्रचंड साथ दिली होती. किंग खानला लोकांनी त्याच्या वादासकट स्विकारले.

शाहरुखला करावा लागला बहिष्काराचा सामना

देशातील अनेक राज्यांमध्ये शाहरुखच्या चित्रपटावरुन वाद झाला होता. त्याचे चित्रपट थिएटरमध्ये दाखवू नयेत असे काही धर्म संघटनांनी फतवेही काढले होते. त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. शाहरुखच्या कोट्यवधी चाहत्यांनी त्याचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. यावर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पठाणचे नाव घेतले गेले.

शाहरुखचा लूक

एक हजार कोटींची कमाई करणारा चित्रपट म्हणून किंग खानच्या या चित्रपटाचे कलेक्शन खूप काही सांगून जाणारे होते. त्यामुळे त्याच्या आगामी जवान नावाच्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या चित्रपटातील गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. तीनशे कोटींचे बजेट असणाऱ्या जवानमध्ये शाहरुखचा लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

शाहरुखचे चित्रपट

शाहरुख हा बॉलीवूडचा सर्वाधिक लोकप्रिय असा अभिनेता आहे. केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये त्याचे चाहते आहेत. अशात त्याचा कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित व्हायचा असल्यास त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखनं जवानच्या शुटींगमध्ये परिधान केलेल्या शर्टची किंमत ही एक लाख रुपये असल्याचे बोलले जातेय.

तब्बल एक हजार डान्सर

शाहरुखनं जवान मधील एका गाण्यासाठी तब्बल एक हजार डान्सर एकत्र आणले होते. अशी माहिती आहे. यावरुन आपल्याला जवान आणि या चित्रपटाचा डामडौल लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ७ सप्टेंबर रोजी शाहरुखचा जवान थिएटरमध्ये रिलिज होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये साऊथचा विजय सेतूपती, नयनतारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पठान आणि जवानचे बजेट

पठाणनं एक हजार कोटींची कमाई केल्यानंतर आता शाहरुखच्या जवानकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट देखील पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याची चर्चा आहे. सध्या पठाण आणि जवानच्या मेकिंगची चर्चा आहे. पठाणची निर्मिती २५० कोटींमध्ये करण्यात आली होती. जवानचा निर्मितीचा खर्च ३०० कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बनावट गिऱ्हाईक बनून पोलीस पोहोचले अन्... गोव्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची केली सुटका; दलालांचे धाबे दणाणले

अपहरण, जबरदस्ती अन् पाशवी अत्याचार! आर्केस्ट्रात काम करणाऱ्या तरुणीची 6 नराधमांनी लुटली अब्रु; पूर्णियाात ओलांडली क्रौर्याची सीमा

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT