ShahRukh Khan's Movie Jawan: बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान याच्या आगामी 'जवान' या चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली कुमार आता वादात फसला आहे. 'जवान' चित्रपटावर कथाचोरीचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात अॅटली कुमार याच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
अॅटलीने तमिळ चित्रपट 'पेरारासु' च्या कहाणीवरून 'जवान'ची कहाणी घेतली आहे. दोन्ही कथांमध्ये बरेच साम्य आहे. असे आरोप या तक्रारीत अॅटलीवर केले गेले आहेत. अॅटलीच्या सर्वच चित्रपटांवर हॉलीवुडचा प्रचंड प्रभाव असल्याचे दिसून येते. 'जवान' चित्रपटातील शाहरूखचा लूक देखील हॉलीवुडच्या 'डार्कमॅन' या चित्रपटातील लियाम निस्सन या अभिनेत्या लूकवरून घेतल्याचे स्पष्ट झाले होते.
मणिकम नारायणन नावाच्या निर्मात्यांनी ही तक्रार केली आहे. 'जवान'ची कहाणी पेरारासु या तमिळ चित्रपटाशी मिळतीजुळती आहे. तथापि, अॅटलीबाबत हे पहिल्यांदाच घडत नाही आहे. त्यांच्यावर याआधीही असे आरोप झालेले आहेत. दरम्यान, या आरोपांची तपासणी तामिळ फिल्म प्रोड्युसर्स काऊन्सिल 7 नोव्हेंबरनंतर करणार आहे. पेरारासू हा 2006 मध्ये रीलीज झालेला चित्रपट आहे. यात अभिनेता विजयकांत दुहेरीत भुमिकेत होते. यात जुळ्या भावांची कथा होती. ते लहानपणी विभक्त होतात, आणि एका गंभीर स्थितीत एकमेकांसमोर येतात.
'जवान' मध्ये किंग खान दुहेरी भुमिकेत दिसणार आहे. तथापि, चित्रपटाची कहाणी काय आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण बँक रॉबरी असे कथानक असू शकते, अशी चर्चा आहे. या चित्रपटात शाहरूख जवानाच्या भुमिकेत दिसणार आहे. 'जवान'चा एक मोठा अॅक्शन सीक्वेन्स नुकताच चेन्नईत चित्रित करण्यात आला आहे.
या चित्रपटातून दाक्षिणात्य तारका नयनतारा बॉलीवुडमध्ये पदापर्ण करत आहे. तर दक्षिणेतला सुप्रसिद्ध संगीतकार अनिरू्ध रविचंदर देखील या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये येत आहे. हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.