Pathaan Teaser: किंग खान इज बॅक; शाहरूखच्या बहुप्रतिक्षित 'पठाण'चा टीझर आला...

वाढदिनी दिली चाहत्यांना भेट; नेटकऱ्यांकडून कौतूक आणि ट्रोलिंगही
Pathaan Teaser
Pathaan TeaserDainik Gomantak
Published on
Updated on

Pathaan Teaser: बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा आज वाढदिवस. आणि हेच औचित्य साधत यशराज फिल्म्सने शाहरूखच्या आगामी बहुप्रतिक्षित 'पठाण' या चित्रपटाचा टीझर रीलीज केला. या अॅक्शनपॅक्ड ट्रेलरला नेटकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Pathaan Teaser
Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानकडून तुम्हीही शिका 'या' 5 गोष्टी; नक्कीच मिळेल यश

शाहरूखच्या पुनरागमनाचा चित्रपट म्हणून आधीच या चित्रपटाची मोठी हाईप निर्माण झाली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगु भाषेत रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे 'पठाण'चा टीझर येताच शाहरूखच्या आगामी 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटही ट्रेंडिंगमध्ये आले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर या टीझरवरून शाहरूख विरूद्ध प्रभास असे युद्धही सुरू झाले आहे. या टीझरमधील एका दृश्याची तुलना प्रभासच्या 'साहो' या चित्रपटातील एका दृश्याशी केली जात आहे.

Pathaan Teaser
Jimmi Jimmi Song in China: चिनमध्ये लॉकडाऊनने त्रस्त जनता गातेय मिथून-बप्पीदांचे गाणे

शाहरूखच्या चाहत्यांनी मात्र हा टीझर डोक्यावर घेतला आहे. शाहरूखचा हा अॅक्शन अंदाज पाहून चाहते खूष झाले आहेत. 25 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट रीलीज होणार आहे. यशराज फिल्म्स या चित्रपटाचा निर्माता असून सिद्धार्थ आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी यापुर्वी हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अॅक्शन चित्रपट करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आणि त्याची झलक 'पठाण'च्या टीझरमध्येही दिसून येत आहे. शाहरूखचा लाँग हेअर लूक आणि वेगवान फायटिंगमुळे टीझरवरून हा एखादा हॉलीवूडचा चित्रपट वाटत आहे.

शाहरूखने यापुर्वी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झीरो' या चित्रपटात मोठ्या पडद्यावरील अखेरचे दर्शन दिले होते. तो चित्रपट अपयशी झाल्यावर शाहरूखने बराच काळ कामातून ब्रेक घेतला होता. पुढील वर्ष मात्र शाहरूखचे असणार आहे. 'पठाण'नंतर शाहरूखचे अॅटलीकुमार दिग्दर्शित 'जवान' आणि राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' हे चित्रपटही पुढच्या वर्षात रीलीज होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com