ShahRukh Khan's Movie Jawan Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Updates : शाहरुखचा बॉयकॉट गँगला पुन्हा धक्का...जवान रिलीजपूर्वीच जोमात

Rahul sadolikar

Jawan Shah Rukh Khan Movies  : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलीवूडच्या किंग खानच्या जवानचा प्रीव्ह्यु काय प्रदर्शित झाला त्यानंतर चाहत्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. वयाची साठ वर्षे ओलांडली तरी शाहरुख काय गोष्ट आहे हे त्यानं त्याच्या या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. काल सोशल मीडियावर जवान या चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलिज करण्यात आला होता.

जवानमध्ये दिसणार हे कलाकार

शाहरुख, दीपिका पदूकोण, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक, विजय सेतूपती यासारख्या कलाकारांची फौज आपल्याला जवानमध्ये दिसणार आहे.

अवघ्या काही वेळातच शाहरुखच्या त्या प्रीव्ह्यूला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचा वेगळाच विक्रम शाहरुखच्या नावावर झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले आहे.

पठाणनेही केला होता मोठा विक्रम

यापूर्वी शाहरुखचा जेव्हा पठाण प्रदर्शित झाला होता तेव्हा त्यावरुन मोठया वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतरही या चित्रपटानं हजार कोटींची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. सोशल मीडियावर आता शाहरुखच्या जवानच्या प्रीव्ह्यूनं जो विक्रम केला आहे त्याची चर्चा होताना दिसते आहे.

जवानने खळबळ उडवून दिली आहे

जवानाच्या प्री-रिलीज व्हिडिओने रिलीज होताच एक खळबळ उडवून दिली आहे. मागील 24 तासांत या चित्रपटानं अनेक भारतीय चित्रपट उद्योगातील टीझर्स आणि ट्रेलर्सद्वारे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मागे टाकले आहे.

जवानने सर्व प्लॅटफॉर्मवर 112 मिलियन व्ह्युसह एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. जवानचा प्रीव्यू पहिल्या 24 तासांत सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओ म्हणून अव्वल ठरला आहे.

रेड एंटरटेनमेंटची निर्मिती

जवान हे रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती असून त्याचे दिग्दर्शन अॅटली, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्माते आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT