Jawan Vs Gadar 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Vs Gadar 2 : जवान आणि तारासिंह यापूर्वीही भिडले होते....सनीच ठरला होता 'शाहरुख'वर भारी

अभिनेता शाहरुख खान आणि सनी देओलचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष यापूर्वीही झाला होता. आणि प्रत्येकवेळी यात सनीने बाजी मारली होती.

Rahul sadolikar

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा बहुचर्चित जवान 11 सप्टेंबरला रिलीज होतोय. जवानची मनोरंजन विश्वात जरी जोरदार चर्चा सुरू असली तरी 'जवान'ला सनीच्या गदर 2 शी जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे.

सध्या गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट कोटींची उड्डाणं घेत असताना जवानची रिलीज डेट अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे.

सनी आणि शाहरुखचा संघर्ष

सनी देओलच्या गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर अजुनही चांगली कमाई करत आहे.चित्रपटाने आतापर्यंत 400 कोटींचा कमाईचा आकडा पार केला आहे.

 प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाच्या कलेक्शनला मिळालेली गती आजही थांबताना दिसत नाही. जवान आल्यानंतरच चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागेल असे मानले जात आहे.

 तथापि, आजच्या थ्रोबॅक गुरूवारमध्ये आम्ही तुम्हाला सनी देओल आणि शाहरुख यांच्यातील बॉक्स ऑफिसवरील लढाईबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये 'सनी'च्या चित्रपटांनी शाहरुखच्या चित्रपटांना मात दिली आहे.

सनी - शाहरुखचा संघर्ष

2001 च्या सुमारास सनी देओलच्या गदरने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. त्याचबरोबर शाहरुखचे अनेक चित्रपट तिकीट खिडकीवरही ब्लॉकबस्टर ठरले होते.

 या सगळ्यामध्ये 26 ऑक्टोबर 2001 रोजी सनी देओलचा इंडियन आणि शाहरुख खानचा अशोका एकाच वेळी रिलीज झाला होता. 

जिथे सनी त्याच्या चित्रपटात एक देशभक्त पोलीस अधिकारी म्हणून दिसला होता. दुसरीकडे, शाहरुखचा चित्रपट पीरियड ड्रामा होता. या दोन्ही स्टार्सचे चाहते या चित्रपटांबद्दल खूप उत्सुक होते.

अंदाज चुकले

शाहरुख बॉक्स ऑफिसवरची लढाई सहज जिंकेल आणि सनीला सगळ्यांचा सामना करावा लागेल, असे मानले जात होते, पण घडले नेमके उलटे. 

लोकांना सनीचा इंडियन खूप आवडला. त्याचवेळी शाहरुखचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. मोठी स्टारकास्ट असूनही, संतोष सिवन दिग्दर्शित अशोका चक्क फ्लॉप झाला.

अशोका

दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर 'इंडियन' चित्रपटाने त्यावेळी 1 कोटी 80 लाख रुपयांची ओपनिंग घेतली होती, तर शाहरुखचा चित्रपट अशोकाने 1 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. 

रिलीज झाल्यानंतर, सनीच्या चित्रपटाने तिकीट खिडकीवर आपली प्रचंड कमाई सुरू ठेवली आणि बॉक्स ऑफिसवर एकूण 24 कोटींहून अधिक कमाई करून हिटचे बिरुद गाठले.

सनी देओल आणि शाहरुख

किंग खानचा अशोका फक्त 11 कोटी 54 लाखांचा गल्ला जमवून फ्लॉप ठरला. कामाच्या आघाडीवर, सनी देओल पुढे गदर 2, माँ तुझे सलाम 2 आणि बाप यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 

जवानानंतर शाहरुख खानही डंकीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणार आहे. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे. 

अनेक दिवसांपासून चाहते डंकीची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज करण्याची तयारी जोरात सुरू आहे.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT