Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: जेव्हा एका चाहतीने शाहरुखला म्हटले,'अक्षय आय लव्ह यू' यानंतर किंग खानने केले असे काही...

दैनिक गोमन्तक

Shahrukh Khan: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान पटकावलं आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते असल्याचे नेहमीच दिसून येते.

चाहत्याबरोबरदेखील त्याच्या अनेक गंमती जमती होत असतात. शाहरुखने एका कार्यक्रमात एका चाहत्याबरोबरचा प्रसंग सांगितला होता. त्याचा परदेस या चित्रपटाच्या दरम्यानचा हा प्रसंग असल्याचे त्याने सांगितले आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याची पत्नी गौरीचे मिसकॅरेज झाले होते.

शाहरुखला लवकरात लवकर घरी पोहचायचे होते त्यामुळे त्याने लॉस एंजेलिस मधून स्पेशल कॉन्कर्ड प्लेन मधून तो पहिल्यांदा न्यू यॉर्कला पोहचला आणि नंतर परत लंडन आला. जिथून तो मुंबईला एअर इंडियाच्या विमानातून येणार होता.

माझ्या मदतीला माणसे नसणे हे खूप वेळा घडते आणि त्यावेळी माझ्याबरोबर कोणीच नव्हते. मी खूप घाईत होतो आणि बॅग घेऊन पळत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आले की,माझ्या मागे एक महिला ऑटोग्राफ साठी पळत होती.

मी तिला सांगितले की माझी फ्लाइट मिस होऊ शकते पण एअरपोर्टपर्यत ती महिला माझ्या ऑटोग्राफसाठी आली होती.त्यावेळी सगळ्या कागदपत्राची पूर्तता करुन तिला ऑटोग्राफसाठी बोलवले. तेव्हा ती म्हणाली , 'मी तुमची खूप मोठी चाहती आहे, खूप मोठी फॅन आहे, अक्षय आय लव्ह यू.' म्हणजे अक्षयची फॅन होती आणि आत्तापर्यत शाहरुखला अक्षय समजत होती.

खरंतर शाहरुख त्यावेळी गौरीच्या काळजीत होता आणि त्या महिलेच्या वागणूकीवर त्याला चीड येऊ शकत होती मात्र त्याने तसे न करता ती महिला नाराज होऊ नये म्हणून शाहरुखने अक्षयच्या नावाने ऑटोग्राफ दिला.

दरम्यान कपील शो मध्ये एकदा अक्षय कुमारला एका मुलीने मी शाहरुखची फॅन असून त्याच्यासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी अक्षयने शाहरुखला फोन लावला होता मात्र शाहरुखचा नंबर स्वीच ऑफ येत असल्याने बोलणं होऊ शकले नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT