Jawan Day 1 Box office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Collection: शाहरुखने पुन्हा इतिहास रचला...'जवान'ची आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटातली सर्वात मोठी ओपनिंग

Jawan Day 1 Box office Collection: शाहरुख खानचा जवान सुपरहिट ठरणार ही चाहत्यांची आणि तज्ज्ञांची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

Rahul sadolikar

Jawan Day 1 Box office Collection: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा जवान 7 सप्टेंबरला रिलीज झाला आणि चाहत्यांनी पुन्हा एकदा शाहरुख खानच्या चित्रपटाला डोक्यावर घेतला. जवान हा ब्लॉकबस्टर ठरेल असा चाहत्यांनी आधीच अंदाज बांधला होता.

चित्रपटाचं प्रमोशन, जबरदस्त स्टारकास्ट, साऊथचा सुपरस्टार दिग्दर्शक अॅटली या जवानसाठी जमेच्या बाजू ठरल्या.

चित्रपटाची कथा आणि शाहरुखचे टिजरमधून दिसलेले वेगवेगळे लूक्स यांमुळे चाहत्यांना जवानची कमालीची उत्सुकता वाटत होती. जवानने हिंदी चित्रपटसृष्टीतलं सर्वांत मोठा ओपनिंग केलं आहे.

चाहत्यांचा उत्साह

अॅटलीने दिग्दर्शित केलेला जवान , गुरुवारी (7 सप्टेंबरला) थिएटरमध्ये प्रदर्शित होताच चाहत्यांना उत्साहाला उधाण आलं . 

Sacnilk.com नुसार , जवान हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिंदी सलामीवीर ठरला. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. 

जवानची कमाई

Sacnilk.com च्या मते, जवानाने पहिल्याच दिवशी भारतात सर्व भाषांसाठी ₹ 75 कोटी नेट कमावले, ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग मानली जाते.

या चित्रपटाने हिंदीमध्ये  65 कोटी, तमिळमध्ये  5 कोटी आणि तेलुगूमध्ये 5 कोटी कमाई केली.  या कमाईसह, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक 'ओपनिंग डे' हिंदी चित्रपट' ठरला आहे.

समाजासाठी झगडणारा जवान

जवान हा चित्रपट एका लढावू योद्ध्याची कथा सांगतो. एक हाय-ऑक्टेन थ्रिलर असणारा जवान समाजातील चुका सुधारण्यासाठी झगडणाऱ्या माणसाची गोष्ट मांडतो. 

सरकारी उदासीनता, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, मोडकळीस आलेली आरोग्य व्यवस्था, सदोष लष्करी शस्त्रे आणि निवासी भागाजवळ उभारलेले धोकादायक कारखाने यासारख्या मुद्द्यांना हा चित्रपट नेमकेपणाने मांडतो.

जवानची स्टारकास्ट

शाहरुख खानसोबत 'जवान'मध्ये अवैध शस्त्रास्त्र विक्रेत्याच्या भूमीकेत दिसणारा विजय सेतुपती आणि एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणारी  नयनतारा दिसते. या चित्रपटात दीपिका पदुकोण देखील कॅमिओमध्ये दिसते. 

चित्रपटात जवानला लढाऊ प्रशिक्षित महिलांच्या गटाचा दाखवला आहे. या महिलांच्या भूमिकेत प्रियामणी, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान आणि आलिया कुरेशी या अभिनेत्री दिसतात.

जय जवान जय किसान

शाहरुख खानचा जवान एका मेहनती शेतकऱ्याची गोष्टही सांगतो जो बँकेच्या छोट्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे आत्महत्या करतो.

भारतात गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मोठी चर्चा झाली. शेतात प्रामाणिकपणे कष्ट करणारा शेतकरी जेव्हा लढण्यासाठी मूठ आवळतो तेव्हा काय होतं? हे जवानने दाखवलं आहे.

झाडाला लटकणारा शेतकरी पाहुन चाहते हेलावून गेले असतील हे नक्की. थोडक्यात शाहरुख जवान आणि किसानाची म्हणजेच शेतकऱ्याची गोष्ट सांगतो.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT