Sidharth Shukla And Shehnaaz Gill Dainik Gomantak
मनोरंजन

शहनाज आजही सिद्धार्थला विसरू शकली नाही, समोर आली ही माहिती

आजही शहनाज सिद्धार्थच्या (Siddhartha Shukla) आठवणी जपून ठेवते, याचा पुरावा तिने नुकताच दिला.

दैनिक गोमन्तक

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला असला तरी आजही शहनाज गिल त्याला विसरलेली नाही. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल पूर्णपणे तुटली होती. दोघांच्या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आणि हे प्रेम आजही कायम आहे. (Shahnaz gill could not forget Siddharth shukla even today

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज सोशल मीडिया (Social Media) आणि पब्लिकपासून दूर होती. मात्र, त्यानंतर शहनाजने स्वतःची काळजी घेतली आणि ती आता कामावर परतली आहे. मात्र, आजही शहनाज सिद्धार्थच्या (Siddhartha Shukla) आठवणी जपून ठेवते, याचा पुरावा तिने नुकताच दिला.

वास्तविक शहनाज (Shehnaaz Gill) विमानतळावर स्पॉट झाली होती. यादरम्यान चाहत्यांना तिच्या फोनमध्ये सिद्धार्थ शुक्लाची झलक पाहायला मिळाली. शहनाजने फोनच्या वॉलपेपरवर स्वतःचा आणि सिद्धार्थच्या हाताचा फोटो टाकला आहे. वॉलपेपरमध्ये एकमेकांचा हात धरलेला फोटो आहे.

हा फोटो सिद्धार्थ आणि शहनाजच्या भुला दूंगा या पहिल्या गाण्याचा फोटो आहे. चाहत्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना युजरने लिहिले - दोघेही हात धरून आहेत. सिद्धार्थचा हात वर आहे. शहनाजने सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी ज्या प्रकारे जपून ठेवल्या आहेत ते खूप खास आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने गेल्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला नाही तर देशभरातील त्याच्या चाहत्यांना सिद्धार्थ आता या जगात नाही यावर विश्वास बसत नव्हता. आजही त्याच्या चाहत्यांच्या आणि कुटुंबीयांच्या आठवणींमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT