Shahid Kapoor Kriti Sanon Dainik Gomantak
मनोरंजन

Shahid Kapoor's Movie First Look : एवढं रोमँटिक?.. शाहिद आणि क्रितीच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?

शाहिद कपूर आणि क्रिती सेननच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर एकदा पाहाच

Rahul sadolikar

फर्जी या वेबसिरीजने सर्वांच्या चर्चेत आलेला शाहिद आता अभिनेत्री क्रिती सेननसोबत दिसणार आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले असुन या पोस्टरमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये बाईकच्या टाकीवर बसलेले दिसतात.

अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सॅनन हे अद्याप नाव न मिळालेल्या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. शनिवारी इंस्टाग्रामवर, क्रिती सेननने स्वतःचे आणि शाहिदचे फर्स्ट पोस्टर शेअर केले. तिने तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत एक अपडेटही शेअर केला आहे

अमित जोशी आणि आराधना साह लिखित आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर यांनी त्याची निर्मिती केली आहे. यात धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाच्या रॅपची घोषणा करताना, क्रितीने लिहिले, "आमच्या अशक्यप्राय प्रेमकथेची घोषणा करत आहे. आमचा नाव नसलेला प्रोजेक्ट ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

Shahid Kapoor Kriti Sanon

पहिल्या लूक पोस्टरमध्ये, कृती आणि शाहिद दोघेही सनसेटच्या बॅकग्राउंडवर समोरासमोर बाईकवर बसले होते. क्रिती सीटवर दिसली तर शाहिद पेट्रोलच्या टाकीवर बसला. पोस्टरवर 'एक अशक्य प्रेमकथा' असे शब्दही लिहिले होते. पोस्टरवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने Reddit वर लिहिले की, “शाहिदला उंच दिसण्यासाठी पेट्रोल टाकीजवळ बसवत नाही.”

"हे थोडं विचित्र दिसत नाही का की पुरुष लीड अॅक्टर टाकीवर आणि महिला सीटवर बसलेली आहे? क्रितीची बॉडी स्ट्रक्चर खरं तर शाहिदपेक्षा मोठी दिसत आहे," अशीही प्रतिक्रिया एका . एका युजरने लिहिले, "शाहिद इतर ठिकाणी बसण्यापेक्षा क्रितीच्या मांडीवर का बसला आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT