Dasara Box Office Collection Day 1: साऊथच्या या चित्रपटाची अजय देवगनच्या भोलाशी काटे की टक्कर...

अभिनेता नानी याचा दसरा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असुन या चित्रपटाची अजय देवगनच्या 'भोला'शी काटे की टक्कर सुरू आहे.
Superstar Nani
Superstar Nani Dainik Gomantak
Published on
Updated on

Dasara Box Office Collection Day 1: अजय देवगनचा भोला हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल शुक्रवारी रिलीज झाला आणि चाहत्यांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं ;चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकींगही चांगलं होतं.

पण याच वेळी साऊथचा एक चित्रपटही रिलीज झाला ज्याने 'भोला'ला मागे टाकले आहे. हा शुक्रवार भारतीय बॉक्स ऑफिससाठी खूप खास ठरला आहे.

 एकीकडे अभिनेता अजय देवगणचा भोला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर दुसरीकडे साऊथचा दसरा हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या तेलगू चित्रपटात टॉलिवूड स्टार नानी मुख्य भूमिकेत आहे.या चित्रपटाने भोलापेक्षाही जास्त कमाई केली आहे. ज्याची व्यापार विश्लेषकांनाही अपेक्षा नव्हती. 

सुरुवातीच्या अंदाजानुसार दसरा या चित्रपटाने पहिल्याच रनमध्ये जवळपास 17 कोटींचा व्यवसाय केला आहे. नानीचा चित्रपट तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

या चित्रपटाने तेलगू भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दसरा चित्रपटाचे जास्तीत जास्त शो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये सुरू आहेत. येथील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहाटे ५ वाजल्यापासूनच पहिला शो सुरू होत आहे.

Superstar Nani
Kangana Ranaut On Nepotism: "बॉलिवूडमध्ये कलाकारांचा खूनही होऊ होतो".. कंगना रणौत हे काय म्हणाली..

दसरा चित्रपटात नानीसोबत अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि धिकक्षित शेट्टी, समुथिराकनी आणि शाइन टॉम चाको हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

दसरा या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत उडेला यांनी केले आहे. नानीने याआधी अनेक चित्रपट केले आहेत, ज्याद्वारे तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळवले आहे. 

2008 मध्ये प्रदर्शित झालेला अष्ट चम्मा हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तो राईड, भीमली कबड्डी जट्टू, आला मोडलेंडी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट अडडे सुंदरा! होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com