Tiger 3 Shooting and Release Date Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger 3: किंग खानने भाईजान सोबतचे शूटिंग पुन्हा पुढे ढकलणार?

Tiger 3 Shooting and Release Date: शाहरुख खान सध्या त्याच्या 'डंकी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक गोमन्तक

बाॅलिवुड मधिल सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान 'टायगर 3' या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खानची जोडी 'पठाण'मध्ये देखिल असणार आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून 'टायगर 3' ची वाट पाहत होते, पण काही ना काही कारणास्तव निर्माते चित्रपटाला पुढे ढकलत आहेत. (Tiger 3 Shooting and Release Date News)

एका रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या 'टायगर-3'चे शूटिंग पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. एका वृत्तानुसार शाहरुख खानला सलमानच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आणखी किमान दोन महिने लागतील. त्यामागील कारण म्हणजे सध्या शाहरुख खान त्याच्या 'डंकी' (Movie) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासाठी त्याने आपला लूक पूर्णपणे बदलला आहे.

* शाहरुख खानने शूटिंग का पुढे ढकललं?
शाहरुख यानंतर 'Atlee' च्या चित्रपटाचे शूटींग करेल आणि त्यानंतरच तो सलमान खानच्या 'टायगर-3' चित्रपटाच्या शूटिंगचा उर्वरित भाग पूर्ण करेल. मिळालेल्या बातम्यांनुसार, शाहरुख खान 'टायगर 3'चे शूटिंग जूनमध्येच पूर्ण करणार होता, मात्र आता पुन्हा एकदा हे शेड्यूल पुढे ढकलण्यात आले आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3'मध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाची रिलीज डेट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर ठेवण्यात आली आहे. शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर, यामध्ये किंग खानसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर परतणार दिसणार आहे. यामुळे चाहत्यामध्ये अधिक उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT