Shah Rukh Khan returns to work, begins shooting for Pathan in Mumbai

 

Dainik Gomantak

मनोरंजन

शाहरुख खान कामावर परतला, मुंबईत 'पठाण'च्या शूटिंगला केली सुरुवात

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तो शेवटचा झिरो चित्रपटात दिसला होता, जो 2018 साली प्रदर्शित झाला होता, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत. आता शाहरुखच्या पठाण या चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. शाहरुखने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी मुंबईत दिसला. यादरम्यान तो लांब केसांमध्ये दिसला. शाहरुखचे लांब केसांमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 22 डिसेंबरपासून शाहरुखने शूटिंगला सुरुवात देखील केली आहे.

शाहरुखचा फोटो व्हायरल झाला

शाहरुख खानने (Shah rukh Khan) पठाणची तयारी सुरू केली आहे. मात्र, अद्याप शाहरुखच्या टीमने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केले नाही. या चित्रपटाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. फोटोमध्ये शाहरुख लांब केस आणि उत्तम शरीरयष्टीत दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे.

पठाणबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी शाहरुख खान यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये पठाणसाठी शूटिंग करत होता. तसेच शाहरुखने काही भाग दुबईत देखील शूट केले आहे. एवढेच नाही तर शाहरुख खान बुर्ज खलिफावर अॅक्शन सीन करताना देखील दिसणार आहे. सलमान खानचाही पठाण या चित्रपटात कॅमिओ असणार आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला NCB ने अमली पदार्था प्रकरणी अटक केली होती. तो 28 दिवस तुरुंगात होता. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानने सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. आर्यन जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे पण तरीही शाहरुखने मीडिया आणि सोशल मीडिया या दोन्हीपासून अंतर ठेवले आहे. घराबाहेरही तो क्वचितच दिसतो. त्याचवेळी गौरी खानने आता सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. नुकतीच तिने दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. तिने तिच्या कामाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टची झलकही दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT