Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

हॉकी प्रशिक्षक ते महिला क्रिकेट संघाचा मालक, शाहरुख खान बनवणार जागतिक दर्जाचे स्टेडियम

अभिनेता शाहरुख खान एका महिला क्रिकेट संघाच्या मालक असून आपल्या संघाला चिअर करण्यासाठी मॅच बघायला जाणार आहे

दैनिक गोमन्तक

शाहरुख खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. यासोबतच आता किंग खान आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. शाहरुख खान आता महिला क्रिकेट संघाचा मालक बनला आहे. एप्रिलमध्ये ग्रेटर लॉस एंजेलिसमध्ये जागतिक दर्जाचे स्टेडियम तयार करण्यासाठी त्याचा क्रिकेट संघ आणि यूएसए MLC T20 पुढे येईल, अशी घोषणा किंग खानने केली आहे. त्यानंतर, या वर्षी होणाऱ्या महिला कॅरेबियन प्रीमियर लीग (WCPL) च्या उद्घाटनात नवीन महिला संघ सहभागी होणार आहे, असल्याचेही शाहरूखने सांगितले. (Shah Rukh Khan Cricket Team)

शाहरुख खानची पोस्ट

सुपरस्टारने म्हटले आहे की, 30 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या WCPL मध्ये महिला संघाचा थेट सामना पाहण्यासाठी तो उत्सुक आहे. ट्विटरवर आपला उत्साह शेअर करताना त्याने लिहिले, '@KKRiders @ADKRiders वर आपल्या सर्वांसाठी आणि अर्थातच @TKRiders वरील लोकांच्या सुंदर सेटसाठी हा आनंदाचा क्षण आहे. आशा आहे की मी हा सामना थेट पाहण्यासाठी तिथे पोहोचू शकेन!!'

शाहरुख खानचे चित्रपट

दरम्यान, शाहरुख खान दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसह सिद्धार्थ आनंदच्या अॅक्शन फ्लिक 'पठाण'मधून पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. तो नयनतारा आणि सान्या मल्होत्रासोबत अॅटलीच्या 'जवान' मध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर राजकुमार हिरानी यांचा 'डंकी' देखील रिलीजसाठी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Ration Card Suspension: गोव्यात रविवारपासून 'या' रेशनकार्डांना बसणार तात्पुरती टाळेबंदी; ई-केवायसीनंतर पुन्हा सक्रिय

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

SCROLL FOR NEXT