Pathan Teaser Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Teaser: पठाणची दमदार एंट्री, दीपिका-जॉनने पहिली झलक

किंग खानने आपली झलक दाखवुन चाहत्यांमधील उत्सुकता वाढवली आहे.

दैनिक गोमन्तक

किंग खानने पुन्हा रुपेरी पडद्यावर आगमन झाले आहे. अलीकडेच पठाणचा (Pathan) टीझर रिलीज करतांना शाहरुख खानने चित्रपटाच्या (Movie) प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यासोबतच त्याच्या लुकची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

किंग खानने आपली झलक दाखवुन चाहत्यांमधील उत्सुकता वाढवली आहे. ही पोस्ट शेअर करत शाहरुख खानने कमेंटमध्ये लिहिले - मला मान्य आहे थोडा विलंब झाला आहे, पण ही तारीख लक्षात ठेवा, पठाणची वेळ आता सुरू होत आहे, 25 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात भेटू. हा मल्टीस्टारर चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खानची भूमिकेची ओळख करून देत दीपिका (Deepika Padukone) आणि जॉन यांनी काही ओळींमध्ये किंग खानच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. जॉन अब्राहम म्हणाला- आपल्या देशात आपण आपल्या धर्म किंवा जातीवरून नावं ठेवले जाते, पण त्याच्याजवळ यापैकी काहीही नव्हत... दीपिका पादुकोण म्हणाली- त्याच्याजवळ नाव ठेवायला काही नव्हतं, तर फक्त भारत देशाची ओळख होती. या टीझरमध्ये शेवटी शाहरुख खान म्हणतो, मी माझ्या देशालाच आपला धर्म मनाला आहे आणि देशाचे रक्षण करणे माझे कर्म आहे. आणि ज्याचे नाव नसते, त्यांचे नामकरण त्याच्यासोबत केले जाते पण ते नाव कसे पडले हे जाणून घेण्यासाठी लवकरच भेटू पठणला.....

या टीझरद्वारे शाहरुख खानने त्याच्या दमदार कमबॅकची झलक दाखवली आहे. आता फक्त 2023 च्या त्या तारखेची वाट पाहत आहोत जेव्हा शाहरुख खानचे पुनरागमन पुन्हा एकदा चित्रपटगृहात दिसणार आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT