Jawan |Shah Rukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan: किंग खानच्या 'जवान' चित्रपटाचा टिझर तुम्ही पाहिलातं का ?

Shah Rukh Khan New Look: शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Puja Bonkile

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या दिवसापासून त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा होती. दिग्दर्शक ऍटली यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही भेटवस्तूपेक्षा कमी नाही. 'जवान' या चित्रपटाचे नाव आहे. त्या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे. रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानची झलकही दाखवण्यात आली असून त्यात तो अॅक्शन पॅक्ड अवतारात दिसत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये येणार आहे. (Shah Rukh Khan New Look Jawan News)

व्हिडिओमध्ये (Video) शाहरुख शस्त्रांनी भरलेल्या जुन्या ठिकाणी उभा असलेला दिसत आहे. तो आपला चेहरा कापडाच्या तुकड्याने पट्टीसारखा बांधतो. त्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत. त्याने एक डोळा झाकलेला आहे. कॅमेरा बंद झाल्यावर शाहरुख (Shah Rukh Khan) हसतो आणि म्हणतो, 'रेडी?' टीझरमध्ये कधी त्याच्या हातात बंदूक तर कधी चाकू आहे. कधी शाहरुख शस्त्रांनी भरलेल्या पिशवी हातामध्ये दिसत आहे.

शाहरुखने टीझर शेअर केला आहे

टीझर शेअर करताना शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ऍक्शन पॅक्ड 2023, जवान तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. 2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये भाषामध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT