Scam 2003 Dainik Gomantak
मनोरंजन

Scam 2003: हर्षद मेहतानंतर OTT वर तेलगीच्या घोटाळ्याची कहाणी, अर्थव्यवस्थेला दिला होता 32000 कोटींचा दणका!

Hansal Mehta Web Series: अलीकडेच प्रदर्शित झालेल्या स्कूप या वेबसिरीजला अपेक्षित यश न मिळाल्याने दिग्दर्शक हंसल मेहता यांनी पुढील सीरीजची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

Hansal Mehta Web Series: अलीकडेच प्रदर्शित झालेल्या स्कूप या वेबसिरीजला अपेक्षित यश न मिळाल्याने दिग्दर्शक हंसल मेहता यांनी पुढील सीरिजची घोषणा केली. रविवारी, त्यांनी सांगितले की, 2003 मध्ये अब्दुल करिन तेलगीने केलेल्या स्टॅम्प पेपरच्या फसवणुकीवर आधारित, त्यांच्या हिट सीरिज स्कॅमचा दुसरा सीझन - स्कॅम: 2003 - 2 सप्टेंबरपासून SonyLiv वर प्रसारीत होईल.

'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' असे या सीरिजचे शीर्षक आहे. मेहता यांनी ट्विटरवर प्रीमियरच्या तारखेची घोषणा करताना एक क्लिप पोस्ट केली. स्कॅम 2003 हा पत्रकार-लेखक संजय सिंग यांच्या 'रिपोर्टर्स डायरी' या पुस्तकावर आधारित आहे.

हंसल मेहता यांची ही सलग तिसरी वेब सिरीज

हंसल मेहता यांची ही सलग तिसरी वेब सिरिज आहे, जी पत्रकारांनी सत्य घटना आणि व्यक्तींवर लिहिलेल्या पुस्तकांवर आधारित आहे. स्कॅम 1992 हा देबाशिष बसू-सुचेता दलाल यांच्या पुस्तकावर आधारित होती, तर द स्कूप हे क्राईम रिपोर्टर जिग्ना व्होरा यांच्या 'भायखळा: माय डेज इन प्रिझन' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे रुपांतर होते.

हे पुस्तक स्कॅम 2003 चा आधार देखील आहे. स्कॅम 2003 ही कर्नाटकातील खानापूर येथे जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीच्या जीवनाची आणि 18 राज्यांमध्ये पसरलेल्या त्याच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी आहे.

घोटाळ्याचा मास्टरमाइंड बनण्याचा त्याचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या घोटाळ्याने संपूर्ण देश हादरला होता. या घोटाळ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे (Economy) सुमारे 32,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मानले जात आहे.

तेलगीची कहाणी

लोकप्रिय ओटीटी चित्रपट कौन प्रवीण तांबे? लेखक किरण यज्ञोपवीत यांनी संजय सिंग यांच्यासमवेत स्कॅम 2003 ची कथा लिहिली आणि विकसित केली आहे. या सीरीजची अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि स्टुडिओ नेक्स्ट यांनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे.

स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज 2020 मध्ये रिलीज झाली, ज्याची सर्वत्र प्रशंसा झाली. तेलगीची कहाणी 2 सप्टेंबरपासून सोनी लिव्हवर प्रसारित होईल.

तसेच, काही काळापूर्वी तेलगी, पेपरच्या या घोटाळ्यावर अनधिकृतपणे वेब सिरिज (Web Series) बनवण्यात आली होती. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लूसाठी बनवलेली ही वेबसिरीज आता जिओ सिनेमावर मोफत पाहता येईल.

रोनित रॉयने पेपरमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तर 2003 च्या घोटाळ्यात तेलगीची भूमिका मराठी रंगभूमीचे प्रसिद्ध अभिनेते गगन देव रियार साकारत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT