Sara Ali Khan Instagram
मनोरंजन

Bollywood News: 'या' सिनेमात मराठमोळ्या लूकमध्ये दिसणार सारा अली खान

Sara Ali Khan: गुलाबी रंगाच्या साडीत अवतरली बॉलिवुडची सारा..

दैनिक गोमन्तक

Sara Ali Khan: गोर्जीअस आणि ब्युटीफुल सारा अली खान सोशल मीडियावर भलतीच एक्टीव असते. बॉलिवुड सिनेमांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ मिळाला की सोशल मीडियावर ती काही ना काही शेअर करत असते. साराने सोशल मीडियावर टाकलेल्या तिच्या क्यूट फोटो, ब्युटीफुल व्हिडीओजवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडतो.

सोशल मीडियावर साराने नुकतेच गावाकडे काढलेले एकदम गावटी अंदाजामधले फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिच्यासोबत छोटी मुलं पण दिसत आहेत. सारा लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या सिनेमात (Movie) झळकणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचे नाव अजून समोर आलेले नाही. मात्र या सिनेमाच्या सेटवरीलच साराचे हे फोटो आहेत.

या फोटोमध्ये सारा (Sara ali Khan) गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय. गावाकडंच्या मोकळ्या जागेत खाटेवर बसून सारा फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. गुलाबी साडीवर तिने हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली, कानात झुमके आणि मोकळे सोडलेले केस असा एकदम पारंपारिक लूक केला आहे. या अवतारात सारा गावाकडंची मुलगी म्हणून शोभुन दिसतेय. साराच्या हा मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

लक्ष्मण उतेकर यांच्या सिनेमात सारा अली खान विकी कौशलसोबत झळकणार आहे. याशिवाय सारा पुढील काळात विक्रम मैसीसोबत 'गॅसलाइट' सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. तसेच करण जौहरचे दोन प्रोजेक्ट पण सारा अली खानकडे आहेत. साराने फार कमी वेळात आपल्या बिंधास्त स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर साराची फॅन फॉलोइंग पण मोठी आहे. साराने साऊथ फिल्मसध्ये सुपरस्टार धनुषसोबत काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT