Sara Ali Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Sara Ali Khan : सारा अली खानला सेटवर अनैसर्गिक शक्तींची चाहूल...वांकानेरच्या राजवाड्याचं रहस्य काय?

अभिनेत्री सारा अली खानला गॅसलाईट या आगामी चित्रपटाच्या सेटवर काहीतरी विचित्र जाणवलं आहे.

Rahul sadolikar

आपण आजपर्यंत कित्येक भयपट पाहिले असतील. अभिनेते किंवा अभिनेत्रींचा अभिनय पाहुन आपल्या अंगाची गाळण उडते, पण असाच एक खरा खुरा अनुभव एका अभिनेत्रीला आल्याचं तिने सांगितलं आहे.

बॉलिवूडमध्ये रोमँटिक, अॅक्शन, कॉमेडी आणि हॉरर असे सर्व प्रकारचे चित्रपट दाखवले जातात. चित्रपट पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा प्रकार असतो. यातील काही चित्रपट वास्तविक जीवनावर आधारित आहेत तर काही काल्पनिक आहेत. काही चित्रपट कल्पनेवरही आधारित असतात, अनेकांना भयपटही आवडतात. 

चित्रपट आणि टीव्हीमध्ये भयपट पाहणे सामान्य आहे, परंतु वास्तविक जीवनात भूतांचा सामना करावा लागला तर कोणतीही व्यक्ती भीतीने थरथर कापू शकते किंवा अस्वस्थ होऊ शकते. 

असेच काहीसे गॅसलाइट चित्रपटाच्या सेटवर घडले. हे आम्ही म्हणत नसून सारा अली खाननेच चित्रांगदा सिंगला याचा खुलासा केला आहे.

सारा अली खान ही सध्याच्या नव्या पिढीतील सर्वात प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती लवकरच चित्रांगदा सिंगसोबत गॅसलाइट या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच चित्रांगदा सिंगने खुलासा केला आहे की सारा अली खानला चित्रपटाच्या सेटवर त्रासदायक अनुभव आला. 

चित्रांगदाने सांगितले की, जेव्हा चित्रपटाचे सर्व लोक आणि क्रू मेंबर्स वांकानेर पॅलेसमध्ये शूटिंगचा आनंद घेत होते, तेव्हा पॅलेसमध्ये काहीतरी गडबड झाली. खरंतर साराचं हॉटेल शूटिंग सेटपासून खूप दूर होतं, त्यामुळे हॉटेलपासून पॅलेसपर्यंतचा प्रवास करतानाचा वेळ वाचवण्यासाठी तिने पॅलेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला, त्यादरम्यान तिने जे काही अनुभवलं ते विसरणं सोपं नाही.

या घटनेबद्दल चित्रांगदा सिंहने सांगितले की, साराला पॅलेसमध्ये आवाज ऐकू आला. ती बाथरुममध्ये गेली तेव्हा तिला वाऱ्याच्या झोताप्रमाणे कोणीतरी जात असल्याचे जाणवले. या घटनेनंतर सारा फक्त एक रात्र तिथे राहिली आणि तिला समजले की हा महाल थोडा पछाडलेला आहे. यामुळे ती पुन्हा राजवाड्यात परतली. ते म्हणाले की हे अलौकिक आहे की नाही हे आम्हाला माहित नाही पण याचा भयंकर अनुभव घेतल्याचं तिने सांगितले आहे.

साराला आलेला हा अनुभव कितपत खरा आहे हे माहित नाही पण भिती माणसाला पछाडू शकते हे मात्र नक्की. एखाद्या गोष्टीची भिती माणसाला आतुन बाहेरून हलवून सोडत असते कदाचित सारा अली खानच्या बाबती तेच झालं असावं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT