Sanjay Gupta Director Death Dainik Gomantak
मनोरंजन

Sanjay Gupta Death: बॉलिवूडवर शोककळा! घरात झालेल्या अपघातामुळं दिग्दर्शकाचा मृत्यू! वयाच्या 57 व्या वर्षी संजय गुप्ता यांची एक्झिट

Sanjay Gupta Director Death: हिंदी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे.

Sameer Amunekar

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत संजय गुप्ता यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केले आहे.

अशोक पंडित यांनी सोशल मीडियावरून दिली निधनाची माहिती

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी संजय गुप्ता यांच्या निधनावर शोक व्यक्त करत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली. ही बातमी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद असल्याचे त्यांनी म्हटले. संजय गुप्ता हे उत्तम कथाकथन करणारे, उत्साही व्यक्तिमत्त्वाचे आणि चित्रपट निर्मितीची प्रचंड आवड असलेले दिग्दर्शक होते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली.

अशोक पंडित यांच्या पोस्टनुसार, घरात डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे संजय गुप्ता यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान दिग्दर्शक गमावला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाला’मधून मिळाली वेगळी ओळख

संजय गुप्ता यांनी आपल्या कारकिर्दीत अ‍ॅक्शन, क्राइम ड्रामा आणि थ्रिलर प्रकारातील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘जंग’, ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’ हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये दमदार संवाद, अ‍ॅक्शन सीन्स आणि वेगळ्या दृश्यशैलीचा अनुभव प्रेक्षकांना मिळत असे.

१९९४ मध्ये ‘आतिश: फील द फायर’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘कांटे’ या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर आधारित कथा आणि वेगळ्या मांडणीमुळे त्यांच्या चित्रपटांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. ‘शूटआउट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’सारख्या चित्रपटांनीही त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाचे स्थान मिळवले.

पुणे-मुंबई प्रवासादरम्यान झाला होता गंभीर अपघात

संजय गुप्ता यांच्यासोबत यापूर्वीही एक मोठा अपघात घडला होता. काही वर्षांपूर्वी पुण्याहून मुंबईला प्रवास करत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. मात्र, उपचारानंतर ते या अपघातातून सावरले आणि पुन्हा चित्रपट दिग्दर्शनाच्या कामात सक्रिय झाले होते.

वैयक्तिक आयुष्य आणि सोशल मीडियावरील सक्रियता

संजय गुप्ता यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली होती. त्यांनी अनु लेखी यांच्याशी विवाह केला होता. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला; मात्र पुढे त्यांनी पुन्हा एकमेकांशी विवाह केला होता. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सक्रिय होते. चित्रपटसृष्टीतील घडामोडी आणि विविध मुद्द्यांवर ते अनेकदा स्पष्टपणे आपले मत मांडत असत.

त्यांच्या अलीकडील पोस्टपैकी एका पोस्टमध्ये उत्तराखंडमधील कार्यक्रमाशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गायक दलेर मेहंदी यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या चित्रपटांमधून त्यांनी निर्माण केलेली वेगळी शैली आणि योगदान प्रेक्षकांच्या स्मरणात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जरा तरी लाज बाळगा! पाकिस्तानी क्रिकेटपटूला विचारलं 'Who Are You?' तर म्हणाला, 'I Am Fine'; व्हिडीओ व्हायरल

Ferry Service Problems: दोन जुन्या फेरीबोटी, हजारो प्रवासी अन् अनिश्चित सेवा; सारमानस-टोंक मार्गावर नवी बोट कधी?

House Fire: तेंबेवाड्यात आगीचे तांडव; घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला सरकारचा मदतीचा हात

E Challan Fraud Alert: ई-चलन भरताना सावधान! बनावट लिंकवर क्लिक करण्याआधी अधिकृत पोर्टलची खात्री करा

Upcoming Cars November 2026: कारप्रेमींसाठी नोव्हेंबर ठरणार खास! महिंद्राच्या Thar E सह मर्सिडीज-बेंझच्या आलिशान कारपर्यंत 7 नव्या गाड्यांची एन्ट्री होणार, पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT