Sameer Wankhede Controversy
Sameer Wankhede Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Controversy: आर्यन खान प्रकरणात CBI शाहरुखची मॅनेजर 'पूजा ददलानी'चा जबाब नोंदवणार

Rahul sadolikar

Sameer Wankhede Controversy: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

या प्रकरणात CBI शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप

आर्यन खानच्या कथित ड्रग्ज प्रकरणाची चर्चा गेले काह दिवस सुरू आहे. या प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी चुकीची कारवाई करत लाच मागितल्याचा आरोप CBI च्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांची दिल्ली इथल्या CBI कार्यालयात चौकशीही करण्यात आली.

समीर वानखेडे यांच्या घरावर छापे

आर्यन खान ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर एजन्सीने मुंबई, दिल्ली, रांची (झारखंड) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) अशा 29 ठिकाणी छापे टाकले.

वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. यानंतर देशभक्त म्हणून शिक्षा होत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता.

समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया

वानखेडे म्हणतात "मला देशभक्त म्हणून बक्षीस मिळत आहे, काल 18 सीबीआय अधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि माझी पत्नी आणि मुले घरात असताना 12 तासांपेक्षा जास्त काळ झडती घेतली. त्यांच्याकडे 23,000 रुपये आणि चार मालमत्तेची कागदपत्रे सापडली. या संपत्ती यापूर्वी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मी सेवेत रुजू झालो,”

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्नी क्रांती रेडकरचा फोनही ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. त्याशिवाय सीबीआयने त्याची बहीण यास्मिन वानखेडे हिच्या घरातून 28,000 रुपये आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून 28,000 रुपये जप्त केले. वानखेडे यांच्या सासरच्या घरी समीरकडून 1800 रुपये जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT