Samantha Ruth Prabhu  Dainik Gomantak
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: समंथाचे नखरे! निर्मात्यांना घातली 'ही' अट; पूर्ण केली तरच वाचणार नवीन स्क्रिप्ट

Samantha Ruth Prabhu: आता मात्र दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांसमोर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपट आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटासोबत भारतीय चित्रपटसृष्टीत मोठे योगदान देत आहेत.

गेल्या काही काळात बॉलीवूडपेक्षा वरचढ ठरतील असे काही चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांसमोर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे.

पॅन इंडिया चित्रपटांसाठी त्यांनी बॉलीवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांना चित्रपटात कास्ट करण्यास सुरुवात केली आहे.

बॉलीवूडमधील अभिनेत्रींना साऊथच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन मिळते. बॉलीवूडच्या अभिनेत्री दीपाका पादुकोण, जान्हवी कपूर आणि मृणाल ठाकूर या अभिनेत्रींनी जास्त मानधनाची केलेली मागणी दाक्षिणात्य निर्मात्यांनी मान्य केली होती.

मिळालेल्या माहीतीनुसार, जान्हवीने डेब्यू फिल्मसाठी 10 करोड रुपए मानधन घेतले होते. मात्र साऊथच्या अभिनेत्रींना मात्र बॉलीवूडच्या तुलनेत अत्यंत कमी मानधन म्हणजेच 2 ते 5 कोटी मानधन दिले जाते. आता यावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभुने आवाज उठवला आहे.

विविध चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सांमथाने आता दाक्षिणात्य निर्मात्यांना जर प्रोजेक्ट संपूर्ण भारतासाठी असेल तर आपण 10 करोड रुपए मानधन घेणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे दाक्षिणात्य निर्माते हैराण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्यासमोर हे एक आव्हान असल्याचेदेखील दिसून येत आहे.

जर निर्माते तिचे मानधन वाढवणार असतील तर ती नवीन स्क्रीप्ट ऐकूण घ्यायला तयार असल्याचे सांमथाने सांगितले आहे. त्यामुळे जर सांमथाची अट जर पूर्ण केली गेली तर इतर अभिनेत्रींचे मानधनदेखील वाढण्याची शक्यता आहे. आता दाक्षिणात्य निर्माते याला कसे सामोरे जाणार आणि सांमथाची ही अट पूर्ण होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT