Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan: सलमानने सांगितले 'या' 2 चित्रपटांच्या अपयशाचे कारण ?

Salman Khan: सलमानने माध्यमांशी बोलताना त्याबद्दल खुलासा केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Salman Khan: नुकताच प्रदर्शित झालेल्या टायगर ३ या सलमानच्या चित्रपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सलमानच्या गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.

सलमानने माध्यमांशी बोलताना त्याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की “किसी का भाई किसी की जान’’ आणि अंतिम हे दोन्हीही चित्रपट टायगर ३ च्या आर्थिक यशाशी तुलना करु शकले नाहीत.

या मुलाखतीदरम्यान सलमानने बॉक्स ऑफिसवरील कमाई आणि मुल्य निर्धारण,रणनिती अशा अनेक विषयावर चर्चा केली. सलमान म्हणाला जेव्हा चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा बॉक्सऑफिसवरील मुल्य निर्धारण केले नसल्याचे सांगितले.

सलमानने ‘’ किसी की भाई किसी की जान’’ आणि अंतिम चित्रपट(movie) प्रदर्शित करण्याची तारीख आणि वेळेला जबाबदार धरले आहे. हे दोन्ही चित्रपट आताच्या घडीला प्रदर्शित झाले असते तर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंती दिली असती असे त्याने म्हटले आहे.

यावेळी पीव्हीआर मधील लोकांनी सलमानशी संवाद साधला ते म्हणाले की चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जवळपास २५ ते ३० % टक्के कमी झाली आहे. तसेच मॉलमध्ये तर त्यापेक्षा कमी असल्याचे सांगितले.

त्यावेळी सलमान म्हणाला की मी काही सुपरस्टार नाही, डीओपी आणि पटकथा लेखक आणि वांद्रेमधील अनेक लोक आहेत ज्यांनी या मुलाला सुपरस्टार करण्यास मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT