Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टिझर25 जानेवारीला रिलीज होणार मोठ्या पडद्यावर

सलमान खानचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चं टिझर आता मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

Rahul sadolikar

Salman Khan new Movie's trailor release in thaeaters : सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टीझर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे आणि आता या महिन्याच्या शेवटी ईदच्या आधी सलमानच्या चाहत्यांना भव्य मेजवानी देण्याची तयारी करण्यात आली आहे. निर्माते आता चित्रपटाचा टीझर रुपेरी पडद्यावर आणत आहेत आणि तो 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

सलमानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' चा टीझर 25 जानेवारीला शाहरुख खानच्या 'पठान' सोबत देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर चित्रपटाचा टीझर यूट्यूब आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. निर्मात्यांनी या लॉन्चसाठी एक अनोखी योजना आणली आहे जी 'थिएटर्स फर्स्ट' फंडावर आहे म्हणजेच ती आधी थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर आणि नंतर डिजिटलवर लॉन्च केली जाईल.

चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सलमान खानने लिहिले की, 'किसी का भाई किसी की जानचा टीझर आता २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर पहा.' 25 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटासोबतच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सलमान खाननेही या पोस्टमध्ये सर्व कलाकारांना टॅग केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT