Chhatriwala Trailor Release :'छतरीवाली' चं ट्रेलर रिलीज...सेक्स एज्युकेशनवर चित्रपट नेमकं काय बोलणार?

अभिनेत्री राकुलच्या छतरीवाला चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे.हा चित्रपट सेक्स एज्युकेशनवर बोलणार असल्याचं ट्रेलरमधुन कळतं
Chhatriwali
Chhatriwali Rakul-Preet-singh

अभिनेत्री राकुल प्रीत हिचा आगामी चित्रपट 'छतरीवाली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं असुन त्यातुन चित्रपटाचा विषय समजु शकतो.

ज्या विषयावर बोलताना महिला किवा कुणीही तयार होत नाही अशाच विषयावर चित्रपट भाष्य करतो. 'छतरीवाली'चं ट्रेलर अत्यंत प्रभावी आणि मनाला भिडणारा असाच आहे.

आपल्या देशात 'सेक्स' या विषयावर बोलणं असभ्यपणाचं मानलं जातं. अशिक्षित वर्ग तर या विषयापासुन कोसो दूर असतोच पण शिकलेला किंवा उच्चमध्यम वर्गही या विषयावर चर्चा करणं टाळतो.

साहजिकच लैंगिक अज्ञानातुन नवीन प्रश्न निर्माण होतात.आणि याचे परिणाम महिलांना भोगावे लागतात. राकुलचा आगामी चित्रपट 'छतरीवाली' हेच सांगतो. चित्रपटाच्या ट्रेलरमधुन कथा स्पष्ट होते.

Chhatriwali
Pathan Controversy: हुश्श ! 10 कट्सनंतर 'पठाण'ला मिळणार UA सर्टिफिकेट..

चित्रपटाचं ट्रेलर अतीशय सुचक आहे. ट्रेलरमध्ये दाखवलं आहे की एका शाळेत एक विद्यार्थीला सेक्स बद्दल थेट विचारताे तेव्हा शिक्षक संंकोचुन उत्तर देतात कि जेव्हा एक पक्षी दुसऱ्या पक्षावर बसतो तेव्हा....पहिला सिन संपतो.

दुसऱ्या एका सिनमध्ये एकदम बिनधास्त आणि खुल्या विचारांची राकुल दिसते, जेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिच्या जवळ येतो तेव्हा तो कंडोमचा वापर करणार नाही असं म्हणतो. राकुल बघते नीट काळजी न घेतल्यामुळे तिच्या वहिनीचं दोनदा अबोर्शन होतं. राकुल या सगळ्यामुळे खुप अस्वस्थ होते आणि मुलांना सेक्स एज्युकेशन देण्याचा विडाच उचलते.

अडीच मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये आपल्याला एक विद्रोही नायीका दिसते. शाळेचे इतर शिक्षक तिच्या या प्रयत्नांना विरोध करत असताना राकुल तिचा संघर्ष सुरूच ठेवते. परंपरागत मानसिकतेच्या विरोधात लढत असताना तिला विरोधही सहन करावा लागतो.

हा चित्रपट एक नवा विचार घेऊन येतो हे नक्की. चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवस्कर याचं आहे. या चित्रपटात राकुल प्रीत मुख्य भूमीकेत दिसेल तर तिच्यासोबत सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलूवालिया, राजेश तैलंग, प्राची शाह पांड्या, राकेश बेदी आणि रीवा अरोडा हे कलाकार दिसतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com