International Film Festival Of India Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 2021: सलमान खानचा 'दबंग' अंदाज, रणवीर सिंगचा 'धमाका' परफॉर्मेंस, Video

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival Of India) 52 वी आवृत्ती सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival Of India) 52 वी आवृत्ती सुरू झाली आहे. या चित्रपट महोत्सवात चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. यापैकी अनेक सेलिब्रिटी मंचावर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत. या सोहळ्यात सलमानच्या (Salman Khan) दबंग डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्यासोबत रणवीर सिंगनेही (Ranveer Singh) आपल्या अप्रतिम उर्जेने मेळाव्यात भर घातली.

सलमानने दबंगची सिग्नेचर स्टेप दाखवली

गोव्यात हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात सलमान खानच्या नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. दबंगच्या 'हुड हुड दबंग' या गाण्यावर सलमानने फुल स्टाईलमध्ये डान्स केला. त्याची स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या चित्रपट महोत्सवाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये सलमान खानचा डान्स परफॉर्मन्स दिसत आहे. Isalmansdevotee नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने सलमानचा व्हिडिओ शेअर केला आहे. ग्रुप डान्सर्ससोबत सलमान दबंगची सिग्नेचर स्टेप करतोय. पहिल्या दिवशीचा सलमानचा डान्स हा शेवटचा परफॉर्मन्स होता.

याशिवाय रणवीर सिंगनेही आपल्या एनर्जीने तेथील वातावरण प्रसन्न केले. नेहमीप्रमाणेच त्याच्या कामगिरीमध्ये पूर्ण एनर्जी दिसून आली. 'कर हर मैदान फतेह' या गाण्यावर श्रद्धा कपूरने मस्त डान्स केला. सलमान खान आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय श्रद्धा कपूर, मौनी रॉय, जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स दिला आहे.

या सोहळ्याला मोठे नेते आणि कलाकार उपस्थित होते

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन करण जोहर आणि मनीष पॉल यांनी केले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.

हेमा मालिनी यांचा गौरव केला

या कार्यक्रमात हेमा मालिनी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी एएनआयला सांगितले की, “हे माझ्या अनेक वर्षांच्या श्रमाचे फळ आहे. खासदार असतानाही मी मथुरेत विविध कामे करत आले आहे, त्यामुळे त्याचा प्रेक्षकांवरही परिणाम होतो कारण आधी मी डान्सर आहे, नंतर चित्रपट कलाकार आणि आता खासदार आहे.”

28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमारे 73 देशांतील 148 चित्रपटांचा समावेश असेल. 12 जागतिक प्रीमियर्स आणि सात आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, 26 आशिया प्रीमियर्स आणि सुमारे 64 भारतीय प्रीमियर्स होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेप्रकरणी रोशन रेडकर यांना चौकशीसाठी बोलावले; हणजूण पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी

SCROLL FOR NEXT