Salman khan: Tiger-3
Salman khan: Tiger-3 Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger-3 साठी सलमान घेतोय खास मेहनत

दैनिक गोमन्तक

सलमान खान ((Salman khan) सध्या टायगर 3 (Tiger-3) या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत आहे. या चित्रपटात तो रॉ एजंट च्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला त्या व्हीडिओमध्ये सलमान रॉ एजंट ची भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घेत आहे, हे त्याच्या चाहत्यांना दिसून आले. त्याच्या या व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Salman khan working on his muscles in the gym)

सलमान जिममध्ये (gym) वर्कआऊट करतांना दिसला आहे. हा व्हिडिओ आरशातून चित्रीत करण्यात आला आहे ज्यामुळे त्याचा ओरीजनल लूक समोर येत नाही मात्र तो आपल्या बायसेप्सवर (muscles) मेहनत घेतांना दिसला. सलमानने या पोस्टला “मला वाटतं हा माणूस टायगर 3 साठी प्रशिक्षण घेत आहे.” टायगर जिंदा है यांचे थीम सॉगंही बॅकग्राउंड ला वाजत होते. आगामी चित्रपटाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे, टायगर 3 साठी इमरानही जिममध्ये जोरदार मेहनत घेत आहे. दरम्यान, कॅटरिनादेखील टायगर 3 या चित्रपटात महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहे, हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खान आपल्या पिंच सीझन 2 शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला परत येत आहे. शोच्या पहिल्या एपिसोडचा टीझर समोर आला आहे. ज्यामध्ये त्याचा मोठा भाऊ आणि सुपरस्टार सलमान खान गेस्ट म्हणून आला आहे. या शोमध्ये सलमानने ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

या टीझरमध्ये अरबाजने एका सोशल मीडिया युजरवर भाष्य केले आहे ज्यात त्याने सलमानला सांगितले आहे की, सलमानने चित्रपटाच्या तिकिटातून पैसे लुटून स्वत: ला सेट केले आहे. यासोबतच त्याने सलमानकडे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. यावर सलमानने असे उत्तर दिले की, मी पैसे चोरले नाही, मी हृदय चोरी केले असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

SCROLL FOR NEXT