Salman Khan was bitten by a snake not once but three times

 

Dainik Gomantak

मनोरंजन

सलमान खानला एकदा नव्हे तर तीन वेळा चावला होता साप

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर साप चावला.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर साप चावला. ही बातमी समजल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले. सगळ्यांनाच सलमानची काळजी वाटत होती. मात्र त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता तो पूर्णपणे बरा आहे. वाढदिवसानिमित्त सलमानने मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही घटना सांगितली. पनवेल फार्म हाऊसवर दरवर्षी सलमान खान त्याचा वाढदिवस कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करतो. यावेळीही त्याने तेच केले. भाईजानने फार्म हाऊसच्या बाहेर येऊन मीडियाशी देखील संवाद साधला आणि साप चावल्याची संपूर्ण घटना सांगितली. तसेच त्यांच्या तब्येतीची माहिती देखील दिली.

सलमान खानला तीनदा साप चावला

एएनआयशी झालेल्या संवादात सलमान खानने (Salman Khan) सांगितले की, माझ्या खोलीत एक साप आला होता, जो पाहून मुले घाबरली, म्हणून मी त्याला काठीने बाहेर काढत होतो. तो पाठीवरून माझ्या हातावर आला. त्यानंतर मी त्याला बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या हाताने त्याला पकडले. घराच्या कर्मचार्‍यांनी जेव्हा साप पाहिला तेव्हा त्यांना वाटले की हा साप (Snake) विषारी आहे, त्यानंतर सापाने मला एकदा नव्हे तर तीनदा चावला.

शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सलमानला तातडीने एमजीएम रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी नेण्यात आले. तेथून रविवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सलमानने पुढे सांगितले की, त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. सापाला ही आम्ही सोबत घेऊन गेलो, तिथे आम्हाला समजले की तो विषारी नाही. तरीही मी 6 तास हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मला अँटी व्हेनमचे इंजेक्शन देण्यात आले. मी आता ठीक आहे.

सापाला मारले नाही

सलमान खानने सांगितले की मला बरे वाटत आहे आणि त्याने सापाला मारले नाही. मी परत आल्यावर आम्ही सापाला जाऊ दिले. माझी बहीण खूप घाबरली होती म्हणून मी तिच्यासाठी सापासोबत फोटो क्लिक केला. सापाशी मैत्री केली. त्यानंतर सलमान म्हणाला की, माझ्या बाबांनी विचारले काय झाले? साप जिवंत आहे का? म्हणून मी म्हणालो टायगर पण जिवंत आहे, सापही जिवंत आहे. सलमान खान आज त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT