Salman Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

'टायगर' होणार आता 'बुल', सलमान खान दिसणार या आगामी चित्रपटात

Rahul sadolikar

Salman in upciming movie : सलमान खानने त्याच्या आगामी चित्रपटांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. तो म्हणाला की मी द बुल नावाचा चित्रपट करत आहे. त्यानंतर दबंग 4 आणि किक 2 येतील. मी सूरज (बडजात्याचा) चित्रपटही करतोय. तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होतील. द बुल हा करण जोहर निर्मित चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

2023 मध्ये दोन चित्रपट करणार

यावर्षी बॉक्स ऑफिसवर अभिनेता सलमान खानचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात किसी का भाई किसी की जान आणि टायगर 3 यांचा समावेश आहे. सलमान वर्षभर या चित्रपटांच्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त राहिला.

किक 2

तो किक २ मध्ये काम करेल किंवा सूरज बडजात्याचा नवीन चित्रपट सुरू करेल अशा बातम्या होत्या. मात्र त्यांनी कोणत्याही चित्रपटाबाबत दुजोरा दिला नाही. या दोन चित्रपटानंतर सलमान ब्रेक घेईल आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल असं वाटत होतं. तर, सलमानने या अटकळांना पूर्णविराम दिला आहे.

द बुल अन् बरंच काही

सलमानने त्याच्या आगामी चित्रपटांची संपूर्ण यादी दिली आहे. तो म्हणाला की मी द बुल नावाचा चित्रपट करत आहे. त्यानंतर दबंग 4 आणि किक 2 येतील. मी सूरज (बडजात्याचा) चित्रपटही करतोय. तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होतील. द बुल हा करण जोहर निर्मित चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

विष्णूवर्धन करणार दिग्दर्शन

दिग्दर्शक विष्णुवर्धन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. विष्णुवर्धनने यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी अभिनीत शेरशाह या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात सलमान निमलष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कुछ कुछ होता है या चित्रपटानंतर ही दुसरी वेळ असेल जेव्हा सलमान करणसोबत काम करणार आहे.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT