इफ्फीत ओटीटीसाठी वेब सिरीज निर्मितीबाबत मास्टरक्लास; मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन' टीमने दिले धडे

ओटीटी मंचाने स्वतंत्र सर्जनशील चित्रपटासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली पाहिजे
Master Class  at 54 IFFI Goa | Manoj Bajpayee
Master Class at 54 IFFI Goa | Manoj BajpayeeDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा येथे आयोजित 54 व्या इफ्फीमध्ये अभिनेते मनोज वाजपेयी, राज निदिमोरू, कृष्णा डीके, अपूर्व बक्षी आणि श्रीकृष्ण दयाल या रुपेरी पडद्यावरील दिग्गजांसह, ओटीटीसाठी आकर्षक वेब मालिका तयार करण्यासंदर्भात एक मास्टर क्लास सत्र आयोजित करण्यात आले होते.

नमन रामचंद्रन यांनी या सत्रात सूत्रसंचालन केले, या सत्रात ओव्हर-द-टॉप (OTT) मंचावर डिजिटल प्रेक्षकांसाठी कथा प्रभावीपणे मांडण्याच्या प्रक्रिया आणि बारकाव्यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

"तयारी, सातत्य, पात्राचा आलेख आणि प्रत्येक अभिनेत्याचा कस याला आव्हान देणारा आणि उंचावणारा प्रवाह स्वीकारणे याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला भूमिकेसाठी चांगली तयारी करावी लागेल आणि अन्य सर्व विसरून नवीन कल्पनांना स्विकारण्यासाठी तुमचे मन रिकामे ठेवावे लागेल," असे मनोज वाजपेयी म्हणाले.

ओटीटी मंचाने स्वतंत्र सर्जनशील चित्रपटासाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली पाहिजे, असे ओटीटीचे यश, अपयश आणि भवितव्य यावर बोलताना वाजपेयी यांनी सांगितले.

'द फॅमिली मॅन'च्या यशाबद्दल सांगताना मनोज बाजपेयी यांनी पात्राचा प्रवास पडद्यावर उलगडताना तयारी ही गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी सांगितले. तुमच्या कामात तोचतोच पणा येऊ नये म्हणून सातत्याने शिकणे आणि नवीन कल्पनांसाठी सतत खुले असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

नाट्यकर्मी आणि द फॅमिली मॅन मालिकेतील आणखी एक प्रमुख अभिनेते श्रीकृष्ण दयाल यांनी रंगमंच आणि ओटीटीच्या डिजिटल कॅनव्हासमधील संबंध विशद केले. सातत्यपूर्ण दर्शकसंख्या हा ओटीटी मंचाचा सर्वात मोठा फायदा आहे, असे त्यांनी नमूद केले.

रंगमंचावरील अनुभवातून आत्मसात केलेली शिस्त ही अभिनयाच्या विविध प्रकारांमध्ये अभिनेत्यांकडील क्षमतेचे संवर्धन करण्यास सक्षम करते, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com