Salman Khan postponed the shooting of these big budget films for Shah Rukh and Katrina Dainik Gomantak
मनोरंजन

सलमान खानने शाहरुख आणि कतरिनासाठी पुढे ढकलले या बिग बजेट चित्रपटांचे शूटिंग

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा सगळ्यांचा आवडता आहे. सलमानबद्दल एक गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे की, सलमान जर एखाद्याला मित्र बनवतो तर तो प्रत्येक प्रसंगी मैत्रीच निभावतो, कितीही त्रास झाला तरी सलमान मागे हटत नाही. आता अलीकडेच सलमानने पुन्हा असे काहीतरी केले आहे ज्यावरून असे दिसून येते की भाईजान मैत्री टिकवून ठेवण्यात सर्वात पुढे आहे.

अलीकडेच सलमानने त्याच्या दोन जवळच्या लोकांसाठी त्याच्या दोन चित्रपटांचे शूटिंग पुढे ढकलले आहे, म्हणजेच या महिन्यात भाईजान कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग करत नाहीये. मात्र, तो या महिन्याच्या 26 तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या आगामी 'अतिंम'चे (Antim) प्रमोशन करणार आहे.

बॉलीवूड लाइफच्या बातमीनुसार, सलमान खान या महिन्यात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' चित्रपटात त्याच्या भूमिकेचे शूटिंग करण्याचा विचार करत होता, परंतु सध्या किंग खानला त्याचा मुलगा आर्यनसोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे. त्याने या महिन्यासाठी त्याचे सर्व शूट रद्द केले आहेत. त्यामुळे सलमानने पठाणचे शूटिंगही पुढे ढकलले.

दुसरीकडे, सलमाननेही त्याच्या 'टायगर 3' चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांसाठी पुढे ढकलले आहे. सलमान टायगर 3 चे पुढील शेड्यूल डिसेंबरमध्ये ठेवणार होता, परंतु डिसेंबरमध्ये त्याची खास मैत्रीण कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलचे लग्न असल्याने साहजिकच कतरिना या चित्रपटाचे शूटिंग करू शकणार नाही, त्यामुळे सलमाननेही शेड्यूल पुढे ढकलले आहे.

टायगर 3 ची मुदत जानेवारीपर्यंत वाढवली आहे. आता अशा परिस्थितीत सलमान खान बिग बॉस 15 च्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल आणि त्याच्या आगामी 'अंतिम द फायनल ट्रुथ' या चित्रपटाचे प्रमोशन करेल. या चित्रपटात सलमानसोबत त्याचा मेहुणा आयुष शर्माही मुख्य भूमिकेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

रस्त्यांचा सुमार दर्जाच कारणीभूत! अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदारही जबाबदार; आमदार लोबो

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

SCROLL FOR NEXT