Salman Khan  Dainik Goamantak
मनोरंजन

Salman Khan On Jawan: 'हा असा चित्रपट ...', 'जवान'चा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर भाईजानची प्रतिक्रिया

Salman Khan: हा चित्रपट सुपरहीट ठरला होता.

दैनिक गोमन्तक

Salman Khan: बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या आगामी चित्रपट जवानचा प्रिव्ह्यू नुकताच रिलिज झाला आहे. त्याच्या प्रिव्ह्यूवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एवढा जबरदस्त प्रिव्ह्यू पाहून सेलिब्रिटीदेखील स्वत:ला कौतुक करण्यापासून रोखू शकले नाहीत. आता सलमान खानने देखील आपले मत व्यक्त केले आहे.

सलमान खानने सोशल मिडियावर शाखरुखच्या जवानचा प्रिव्ह्यू शेअर करत चित्रपट रिलिज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण हा चित्रपट पाहायला जाणार असल्याचे म्हटले आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले आहे की, पठाण जवान बनला आहे, आउटस्टॅडिंग ट्रेलर, मला खूप आवडला आहे. आता हा असा चित्रपट आहे की ज्याला चित्रपटगृहातच बघितले पाहिजे. मला विश्वास आहे की मी पहिल्याच दिवशी बघणार आहे. मजा आली वाह! असे म्हणत मी शाहरुखच्या जवान चित्रपटाचे कौतुक केले आहे.

सलमान आणि शाहरुख दोघांनी 1990 शतकाच्या सुरुवातीला चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. दोघांचे नाते आंबट-गोड असल्याचे पाहायला मिळाले आहे. करण-अर्जून या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. हा चित्रपट सुपरहीट ठरला होता. अलिकडेच दोघे शाहरुखचा गाजलेला चित्रपट पठाणमध्ये एकत्र दिसले होते.

पठाणमधील सलमान-शाहरुखचा ट्रेनवरील फायटींग सीन चांगलाच गाजला होता. सलमान खानच्या 'Tiger 3' चित्रपटात शाहरुखदेखील दिसणार आहे. यामध्ये कॅटरीना कैफसुद्धा दिसणार असून मनीष शर्मांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या जवानाच्या पोस्टर्समध्ये शाहरुख खान डोक्यावर आणि चेहऱ्यावर पट्टी बांधलेला दिसत आहे. पण त्याचे रहस्य 'जवान'च्या प्रिव्ह्यूमध्ये उलगडले असून या प्रीव्ह्यूने खळबळ उडवून दिली आहे. 'जवान'मध्ये शाहरुख पुन्हा एकदा दहशत निर्माण करणार आहे. 'जवान'चा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर चाहते ट्विटरवर प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT