Salman Khan  Dainik Goamantak
मनोरंजन

Salman Khan: नवीन चित्रपटासाठी भाईजानची कठोर मेहनत; साकारणार 'ही' भूमिका

Salman Khan: निर्माते यासाठी बॉलिवूड अभिनेत्री नाही तर दक्षिण भारतीय अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Salman Khan: बॉलीवू़डचा भाईजान अर्थात सलमान आजही प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. तो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सतत चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो जेव्हा नवीन हेअरकटमध्ये दिसला होता तेव्हा आता सलमान नवीन प्रोजक्टमध्ये दिसणार अशी चर्चांना उधान आले होते.

आता हा प्रोजेक्ट कोणता असणार या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून याबाबत मोठी माहीती समोर आली आहे.

सलमानचा लूक एका नवीन चित्रपटासाठी आहे, जो देशभक्तीवर आधारित असणार आहे. या चित्रपटात सलमान निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचेही समोर आले आहे. विष्णू वर्धन ‘शेरशाह’ या चित्रपटाचे ज्यांनी दिग्दर्शन केले ते दिग्दर्शक विष्णू वर्धन हा नवा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे.

या चित्रपटाची सलमान खानने तयारी सुरू केली आहे. या भूमिकेसाठी सलमान कठोर प्रशिक्षण घेत आहे. त्याला या भूमिकेसाठी वजन वाढवावे लागणार असून त्याासाठी डाएट आणि व्यायामामध्ये शिस्त पाळावी लागणार आहे.

हा चित्रपट मालदीवमधील १९८८ च्या बंडावर आधारित आहे, जो भारतीय लष्कराच्या मदतीने उधळून लावला होता. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सलमान चित्रपटा( Movie )च्या तयारीला लागला असला तरीही अभिनेत्री कोण असणार याची माहीती समोर आली नाही. असे म्हटले जात आहे की, निर्माते यासाठी बॉलिवूड( Bollywood ) अभिनेत्री नाही तर दक्षिण भारतीय अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार करत आहेत.

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे नाव निर्मात्यांच्या मनात असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सलमान खान दिवाळीच्या मुहूर्तावर 10 नोव्हेंबरला पडद्यावर येणारा 'टायगर 3' रिलीज होण्याची वाट पाहत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

याबरोबरच सलमान सध्या बिग बॉसच्या नवीन सीझनमुळेदेखील चर्चेत आहे. चाहते बिग बॉसच्या नवीन सीझनची आणि सलमानच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferdino Rebello: 'गोवा' सांभाळणे ही काळाची गरज, सत्तेत असलेल्यांनी शब्दांचे भान राखावे! न्यायमूर्ती रिबेलोंचा सल्ला

'उत्पल यांना भाजपात येण्यास विरोध नाही'! मंत्री बाबूश यांचे प्रतिपादन; मनोहर पर्रीकरांचे पक्षासाठी मोठे योगदान असल्याची केली आठवण

LPG Gas Cylinder: गॅस एजन्सींवर करडी नजर! काळाबाजार रोखण्यासाठी 53 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; 25 दिवसांनीच होणार बुकिंग

VIDEO: हृदयद्रावक! मद्यधुंद चालकाने कारखाली चिरडले, कुटुंबाचा आधार हरपला; ताळगाव येथील दुर्दैवी घटना

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोच्या बैलाला श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT