Salman Khan - Elvish Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan - Elvish: एल्विशला फटकारलं आणि सलमानला बसला मोठा फटका, इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स म्हणाले...

बिग बॉस ओटीटीवर सध्या एल्विश यादवला सलमानने चांगलेच फटकारले आणि त्यानंतर त्याच्या इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले.

Rahul sadolikar

Bigg Boss Ott 2: सध्या सोशल मिडीयावर सलमान खान आणि एल्विश यादव यांच्यातल्या बिग बॉसमधल्या तणावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस ओटीटी 2' सध्या खुपच चर्चेत आलं आहे. आता काहीच स्पर्धक या शोमध्ये उरले आहेत.

त्यात वाईल्ड कार्ड एंट्रीत घरात आलेला एल्विश यादव सगळ्या घराला त्याच्या बोटावर नाचवत आहे. त्याने घरात येताच घराचा ताबा मिळवला आणि चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. तो घरात येताच बाकिच्या स्पर्धकांच्या लोकप्रियतेत खुपच घट झाली.

शोमध्ये एल्विशची चर्चा

मात्र तो शोमध्ये त्याच्या बोलण्याने आणि वागण्यामुळे प्रेक्षकांची मन जिंकत असतांना काहीवेळा भानही सोडतो. असं काहीस त्याचं आणि बेबिकासोबत भांडण झाल्यावर घडलं. त्यानंतर 'विकेंड का वार' मध्ये सलमानने त्याचा चांगलाच क्लास घेतला.

सलमान शो होस्ट करत असल्याने त्याने मागच्या काही क्लिप दाखवल्या आणि त्यानंतर एल्विश आणि अभिषेकला चांगलचं फटकारलं आहे. सलमानने यावेळी एल्विश आर्मीवरही निशाणा साधला होता.

एल्विशच्या चाहत्यांनी सलमानला केलं ट्रोल

मात्र एल्विशला रागावणं भाईजानला चांगलचं महागात पडल्याचं दिसत आहे. 'विकेंड का वार' संपल्यानंतर ट्विटरवर सलमान ट्रेडिंग करु लागला. एल्विशचे चाहते त्याला खुपच ट्रोल करु लागले.

तर दुसऱ्याच दिवशी सलमान खानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाल्याचं चित्र दिसत आहे. सलमानच्या इंस्टावर 66.8 मिलियन फॉलोअर्स होते, परंतु एल्विश यादवसोबत झालेल्या वादानंतर त्याचे फॉलोअर्स थेट 63.7 दशलक्षांवर आला आहे. त्याचबरोबर त्याला सातत्याने सलमानला ट्रोलही केलं जात आहे.

स्क्रीनशॉट व्हायरल

त्यातच एक स्क्रीनशॉट देखील व्हायरल होत आहे जो सलमानचा शत्रू गोल्डी ब्रारच्या ट्विटचा असल्याच्या चर्चा आहे. यामध्ये सलमाननं एल्विशला रागावल्याबद्दल गोल्डी याचा बदला घेणार असल्याचं सांगितलं.

मात्र हे ट्विट त्याचं असल्याची अधिकृत असल्याची माहिती नाही. एल्विशच्या चाहत्यांनी त्यालाच बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता घोषित केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT