Viral Memes Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Memes: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर भाईजानवर मजेशीर मीम्स व्हायरल

सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे काल लग्नबंधणात अडकले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी काल लग्नबंधनात अडकले. त्याचे लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या दरम्यान बॉलिवूडमधील मोस्ट इलिजिबल बॅचरल म्हणून ओळख असलेला अभिनेता सलमान लग्न कधी करणार हा जणू काही जागतिक प्रश्नच झाला आहे. कियारा-सिड त्यांच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी सलमान खानवर भन्नाट मिम्स तयार केले आहेत. तुम्हाला हे मीम्स पाहून हसू अनावर होइल.

सिद्धार्थ आणि कियाराचे काल म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न पार पडले. त्यांचा लग्नातील लूक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी सिंगल असलेल्या सलमान खानवर निशाणा साधत भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

एका नेटकऱ्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले " आज माझे मन तुटले,आणि मी देखील पुर्णपणे तुटलो..."

एका नेटकऱ्याने एश्वर्या-अभिषेक, विकी-कतरिना, रणबीर-आलिया आणि कियारा-सिद्धार्थच्या लग्नातील फोटो कोलाज करुन शेअर केला आहे. त्या खाली सलमानचा रागात असलेला फोटो शेअर केला आहे. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू येईल.

दुसऱ्या नेटकऱ्याने एका एक्सचे लग्न झाले, दुसऱ्या एक्सचे लग्न झाले, दुसऱ्या एक्सच्या एक्सचे लग्न झाले. या सगळ्यात तू (सलमान खान) असे म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्याने कमेंट करत सलमान भाईचा विचार करुन वाईट वाटते असे म्हटले आहे.

सलमान खान (Salman Khan) हा सर्वात पहिला व्यक्ती होता ज्याने बिग बॉस या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची हिंट दिली होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा लग्न सोहळा जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये मोठ्या आनंदात पार पडला.

त्यांच्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर, मलायका अरोरा, मीरा राजपूत आणि इतर सेलिब्रिटी रविवारी दुपारीच जैसलमेरला पोहोचले होते.

कियारा अडवाणीची खास मैत्रीण असलेली ईशा अंबानीही या लग्नात सहभागी होण्यासाठी जैसलमेरला पोहोचली होती. सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा सुरु झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT