Salman Khan
Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Birthday: जेव्हा भाईजानने जाळलेला वडिलांचा महिन्याचा पगार, तेव्हा...

दैनिक गोमन्तक

Happy Birthday Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा आज ५८ वा वाढदिवस आहे. गेल्या तीन दशकांहून जास्त काळ भाईजानने आपल्या प्रेक्षकांचे, चाहत्यांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

क्रिकेटर होण्याचा वडिलांनी दिला होता सल्ला; सलमानला व्हायचे होते गायक...

सलमान खानचे वडील म्हणजेच सलीम खान यांना सलमानने क्रिकेटर व्हावे अशी इच्छा होती. मात्र सलमानला गायक व्हायचे होते, त्यामुळे त्यांनी एक गायनाचे शिक्षक देखील आणले होते. मात्र ते नाकातून गात असत. त्यामुळे सलमानदेखील नाकातूनच गात असे ते पाहून सलीम खान यांनी क्रिकेटरच होण्याचा सल्ला दिला होता. मात्र नंतर सलमानने अभिनय क्षेत्र निवडले.

आर्थिक परिस्थिती बेताची

सलमानने एका फिल्मफेअर अवॉर्ड शो मध्ये आपण एकदा वडीलांचा महिन्याचा पगार जाळल्याचा किस्सा सांगितला होता. १०० च्या ७ नोटा त्यांनी जाळल्या होत्या. त्यावळी आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, सलीन खान यांना मिळणाऱे पैसे पुरेसे नसायचे हे माहित असूनदेखील सलमान खानने पैसे जाळले होते. त्यानंतर सलीम खान यांनी खूप मार दिला आणि सलमानला उन्हात उभे केले होते.

पहिला चित्रपट

सलमान खानने १९८८ साली 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून डेब्यू केले होते. यामध्ये सपोर्ट अॅक्टरची भूमिका केली होती. सलमानची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट 'मैंने प्यार किया' हा होता. या चित्रपटात भाग्यश्री होती. त्यांचा हा चित्रपट सुपहिट ठरला होता.

दरम्यान त्यानंतर सलमान खानने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa Today News Live: कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी अखेर खूनाचा गुन्हा नोंद

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT