Salman Khan Fitness Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Fitness: दबंग खानच्या फिटनेसचे रहस्य आहे तरी काय?

Salman Khan Fitness Secret: बॉलिवूडचा दबंग खान फिटनेससाठी ओळखला जातो.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड दबंग खान अभिनयासह फिटनेससाठी सुध्दा फेमस आहे. सलमान खानने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. भाईजान अनेकदा चित्रपटांमध्ये शर्टलेस बॉडी दाखवताना दिसतो. सलमान खान वयाच्या 57 व्या वर्षी खूपच फिट आहे. बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतात. सलमान खानचा केवळ चाहताच नाही तर तो अनेक स्टार्सचा फिटनेस आयडॉल आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे फिटनेस फंडा काय हे जाणून घेउया.

  • अंडी आणि कमी फॅट दूध

सलमान खान (Salman Khan) त्याच्या फिटनेस आणि आरोग्याची विशेष काळजी घेतो. सलमान खान ब्रेकफास्टमध्ये अंडी आणि लो फॅट दूधे सेवन करतो. तो अंड्याचा पांढरा भाग खातो.

  • दुपारच्या जेवणासाठी देसी पदार्थ

सलमान खान आपल्या आहाराची (Diet) विशेष काळजी घेतो. तो दुपारच्या जेवणात रोटी, ग्रील्ड भाज्या आणि सॅलेड खातो. सलमान खान संध्याकाळी बदाम खातो.

  • सलमानचे हेल्दी डिनर

सलमान खान डिनरमध्ये हलके-फुलके पदार्थ खातो. तो रात्री फक्त 2 अंडी, मासे किंवा चिकन सूप खातो. वर्कआउटच्या(Workout) आधी किंवा नंतर सलमान खान प्रोटीन शेक घेतो. वर्कआउट केल्यानंतर तो ओट्स खातो.

  • इटालियन पदार्थ आहेत आवडीचे

सलमान खानने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तो खूप फूडी आहे. सलमान खानला इटालियन पदार्थ खायला आवडते पण तो रोज इटालियन पदार्थ खात नाही. केवळ उत्सवादरम्यान इटालियन फूडचे सेवन करा.

  • गोड पदार्थ टाळणे

सलमान खान आपल्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी मिठाई खात नाही. तो गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT