Salman Khan Injured Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Injured : टायगर 3 च्या शूटींगवेळी सलमान जखमी...फोटो केले शेअर

अभिनेता सलमान खान टायगर 3 च्या शूटींगदरम्यान जखमी झाला आहे, दरम्यान सलमानने फोटोही शेअर केला.

Rahul sadolikar

Salman Khan News : भाईजानच्या फॅन्ससाठी एक चिंताजनक बातमी आहे. सलमान खान, सध्या त्याच्या आगामी स्पाय थ्रिलर, टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. 

सुपरस्टारने ट्विटरवर त्याच्या सेटचा फोटो शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांना याबद्दल अपडेट दिले. फोटोत तो त्याच्या डाव्या खांद्यावर वेदना कमी करणारा पॅच लावून कॅमेर्‍याकडे पाठ केल्याचं दिसत आहे.

सलमानने शेअर केला फोटो

सलमानने फोटोला कॅप्शन दिले आणि लिहिले, "जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही जगाचे भार तुमच्या खांद्यावर घेऊन जात आहात, तेव्हा तो म्हणतो दुनिया को छोडो पांच किलो का डंबेल उठा के दिखाओ .टायगर जख्मी है . #Tiger3 (sic)."

टायगर 3 चे शुटींग

अभिनेता सलमान खान सध्या टायगर 3 च्या शूटींगमध्ये खूपच बिझी आहे.त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या संमिश्र प्रतिसादामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे सलमानच्या सगळ्या अपेक्षा आता टायगर 3 कडुन आहेत.

सलमान खानची ती मुलाखत

सलमान मध्यंतरी एका विधानामुळे चांगलाच चर्चेत आला होता. टिव्हीवरच्या एका प्रसिद्ध कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत सलमानने मुलाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले. सलमान म्हणाला "आता काय सांगु तो काय प्लॅन होता? हा प्लॅन सुनेचा नाही बाळाचा होता. पण भारतीय कायद्यानुसार ते होऊ शकले नाही.आता बघुया काय होतं ते.

चाहत्यांनी सलमानला अलीकडेच अॅक्शन एंटरटेनर चित्रपट किसी का भाई किसी की जानमध्ये पाहिले. फरहाद सामजी दिग्दर्शित, या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, राघव जुयाल आणि जस्सी गिल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

Raksha Bandhan 2025: लहान भावाला द्या अशा भेटवस्तू, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर येईल हसू; पाहा Gift Ideas

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT