Salaar Box Office: शाहरुखचा डंकी आणि प्रभासचा सालार प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहेत. दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र कमाईच्या बाबतीत सुरुवातीच्या दिवसांत सालारने मोठा पल्ला गाठत डंकीला मागे टाकले होते.
250 कोटी बजेटमध्ये बनलेल्या सालार चित्रपटाने जगभर 465 कोटींची कमाई केली आहे. मात्र आता सालार च्या शोला गर्दी कमी होताना दिसत असून डंकीला मात्र प्रेक्षक अजूनही भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत.
'सालार पार्ट 1 सीझफायर' रिलीज झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडाली होती. प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झालेल्या या चित्रपटाने 6 दिवसांत 500 कोटींचा टप्पा पार केला.
मात्र, बुधवारपर्यंत चित्रपटाची कमाई तेजीत असतानाच गुरुवारी अचानक कलेक्शनमध्ये घट झाली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन आणि सुट्ट्यांचा या चित्रपटांवर परिणाम होऊ लागल्याचे दिसते. मात्र, या चित्रपटाने 7 दिवसांत देशभरात 300 कोटींचा कलेक्शन पार केला आहे.
सालार शाहरुखच्या 'डिंकी' चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबर रोजी रिलीज झाला. प्रभासच्या या चित्रपटाच्या कमाईने दक्षिण भारतातील अनेक बंपर चित्रपटांना टक्कर दिली आहे. 90.7 कोटींच्या ओपनिंगसह या चित्रपटाने प्रभासच्या मागील ब्लॉकबस्टर 'बाहुबली 2'लाही मागे टाकले आहे.
'सालार'ने गुरुवारी 13.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि चित्रपटाने 7 दिवसांत एकूण 308.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जगभरात सुमारे 465 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी विदेशात १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
'सालार' चित्रपटात प्रभास एका दमदार भूमिकेत दिसला असून त्याच्या अॅक्शन सीन्सचे खूप कौतुक होत आहे. याशिवाय या चित्रपटात श्रुती हासन, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, टिनू आनंद आणि जगपती बाबू या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट आपल्या मेगा अॅक्शनमुळे आणि दोन मित्रांच्या शत्रू बनण्याच्या कथेमुळे खूप चर्चेत आहे.
आता शाहरुखचा डंकी जवान आणि पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर बॉक्स ऑफीसवर किती कमाई कऱणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.