Prince dada in sairat Dainik Gomantak
मनोरंजन

आर्चीचा भाऊ 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात ‘सैराट’

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज येथील हा कोवळा पोरगा 2016 मध्ये मुलींच्या डोक्यात घर करून गेला.

दैनिक गोमन्तक

मुंबई: सूरज पवार (Suraj Pawar) हे नाव 2016 मध्ये जोरदार गाजल... ‘सैराट’मध्ये (Sairat) प्रिन्सची भूमिका साकरणारा सुरज तरूणाईच्या मनात बसला बसता होता. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज येथील हा कोवळा पोरगा 2016 मध्ये मुलींच्या डोक्यात घर करून गेला. अल्पवयात हीरो ते खलनायकाचा प्रवास करणाऱ्या सूरजला मनोरंजन (Entertainment) जगात प्रकाशझोतात अणण्याचे सारे श्रेय तसे नागराज मंजुळेंचे (Nagraj Manjule).

नागराज यांच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांत स्थान मिळविलेल्या ‘प्रिन्स’ अर्थात सूरजसाठी नागराजच त्याचे आई-बाबा. ‘पिस्तुल्या’ची भूमिका साकारल्यानंतर अर्थात 9-10 वर्षांचा असल्यापासून तो नागराजच्या कुटुंबासोबत राहतोय. अलीकडे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही ‘झुंड’मध्ये त्याने काम केले. आता ‘सैराट’मधील हा प्रिन्स अमरावतीकर राणीच्या प्रेमात पडलाय. तो लवकरच अमरावती मुक्कामी राणी सोबत विवाहबद्ध होत आहेत. कालपरवा पहिल्यांदा सासरी आल्यानंतर त्याने एका वृत्तवाहिनीला सदिच्छा भेट दिली. आणि या लाजऱ्या-बुजऱ्या सूरजने दिलखुलास संवाद साधला.

पाच वर्षांपूर्वी ‘सैराट’ चित्रपटानंतर आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळाली. यात आर्चीच्या भावाची आणि परश्याचा मेहुण्याची भूमिका ‘प्रिन्स’ म्हणजेच सूरज पवारने साकारली होती. ‘पिस्तुल्या’मधल्या या हीरोने ‘सैराट’मध्ये खलनायकाच्या भूमिकेतही आपली एक वेगळी छाप सोडली. ‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याचा दोस्त आणि ‘सैराट’मधील आर्चीचा भाऊ आणि आता मंजुळेंच्या बच्चन स्टारर ‘झुंड’मधील गेस्ट अपियरन्स म्हणून काम केल्यानंतंर सुरज आता रूपेरी पडद्यावर चांगलाच चर्चेत आहे. सूरजने वयाच्या 18 व्या वर्षी खलनायकाची भूमिका साकारली होती.

मास्तरांच्या भीतीने शाळा अर्धवट सोडणाऱ्या सूरजने आईच्या मृत्यूनंतर शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू केला. आता तो नागराज मंजुळेंसोबतच पुण्यात राहतोय. जवळपास ९-१० वर्षांचा असल्यापासून तो नागराज यांच्या कुटुंबासोबत राहत आहे. या कुटुंबाने त्याला आपलंसं करून घरातील एक लाडका सदस्य बनवून घेतले आहे. सुरज स्वत:ही ‘अण्णा माझ्यासाठी सर्व काही’ असल्याची प्रांजळ कबुली देतो. तेव्हा त्याच्या या बोलण्यातून नागराज यांनी सुरजला दिलेल्या प्रेमाची प्रचीती येते.

आज पाच वर्षांनंतरही सैराटची जादू प्रेक्षकमनावर कायम आहे. आजही आर्ची परशाच्या नावाने मुलं मुली गप्पा करतांना दिसतात. मला चित्रपटातच काम करायला आवडतं आणि मी तेच करीत राहणार, असे सांगणाऱ्या सूरजचा ‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT