Saif Ali Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Saif Ali Khan got Angry : "आमच्या बेडरूममध्येच या ना"!...सैफ अली खान का वैतागला?

अभिनेता सैफ अली खान शांत स्वभावाचा आहे पण एका प्रसंगी तो चांगलाच भडकला आहे.

Rahul sadolikar

अभिनेता सैफ अली खान हा एक वेगळ्या पठडीचा अभिनेता म्हणुन ओळखला जातो. 90 च्या दशकातला सैफ आणि 2000 नंतरचा सैफ यांच्यात मोठा बदल बघायला मिळतो. चित्रपटांची निवड, अभिनयाची शैली, अभिनयात आलेली प्रगल्भता यामुळे सैफने आपल्या चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं आहे.

सैफ अली खान तसा शांत स्वभावाचा अभिनेता म्हणुन ओळखला जातो ;पण नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगात तो चांगलाच भडकलेला दिसला. नेमकं काय झालं? चला पाहुया.

गुरुवारी रात्री सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूरला फॉलो करणाऱ्या सर्व फोटोग्राफर्समुळे तो थोडासा चिडलेला दिसत होता . मलायका अरोराच्‍या आईच्‍या वाढदिवसाच्‍या पार्टीतून परतलेल्या सैफला रात्री उशिरा घराबाहेर पापाराझींनी स्पॉट केले. 

पापाराझींनी सैफ आणि करिनाच्या नावाने पोझसाठी आरडा-ओरड केल्याने,सैफ थोडासा नाराज झाला आणि त्याने रागाच्या भरात पापाराझींना चांगलेच बोल सुनावले.

सैफने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा तर करीना शॉर्ट ब्लॅक ड्रेसमध्ये होती. हे दोघे पार्टीहुन घरी पोहोचताच पापाराझी ओरडला 'सर, सर! थांबा न ' त्याच्या घराबाहेरचे फोटो घेण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफर्सवर सेफ शेवटी वैतागलाच.

वैतागलेला सैफ म्हणाला एक काम करा, आमच्या बेडरूममध्ये या.” त्याच्या बोलण्याने खजील होऊन काही फोटोग्राफर ' नाही, नाही' म्हणाले. त्यानंतर सैफने पापाराझींना गुड नाईट म्हटले आणि लॉबीचा दरवाजा बंद केला. या अशा अनेक प्रसंगामधुन आपण हे समजुन घेऊ शकतो की कुठल्याही सेलिब्रिटीचं आयुष्य हे अजिबात साधं नसतं. सैफने ते अनेकदा अनुभवलंही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT