Natu Natu RRR Dainik Gomantak
मनोरंजन

Natu Natu in Oscars 2023: RRR च्या 'Natu Natu'ला अंतिम नामांकन , भारताला यंदा ऑस्कर मिळणार?

RRR च्या 'Natu Natu' हे गाणं आता ऑस्कर मिळण्याच्या शेवटच्या पायरीवर उभं आहे

Rahul sadolikar

Natu Natu in Oscars 2023 संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटेल असा भारतीय संगीताचा गैारव करणारा सुवर्णक्षण लवकरच येणार आहे. संपूर्ण जगासाठी अत्यंत मानाचा असणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात आपली छाप उमटवायला RRR चित्रपटातलं 'नाटू नाटू' हे गाणं सज्ज झालं आहे

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्करच्या अंतिम नामांकनात आपले स्थान निर्माण केले आहे. यासह, भारताने ऑस्कर जिंकण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे चाहते आनंदित झाले आहेत. पण दुर्दैवाने, छेलो शो आंतरराष्ट्रीय फीचर मूव्ही कॅटेगिरीत स्थान मिळवू शकला नाही.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नातू नातू' या गाण्याला 95 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकनात स्थान मिळाले आहे. आता ऑस्कर जिंकण्याच्या भारताच्या आशा वाढल्या आहेत. 

या सोहळ्यात भारताकडून गेलेल्या दोन डॉक्युमेंटरी फिल्मही जिंकल्या आहेत. गुजराती चित्रपट 'चेल्लो शो' (द लास्ट फिल्म शो) ला देशातून अधिकृत एंट्री पाठवण्यात आली होती, परंतु हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

या सगळ्यात ज्युनियर एनटीआरच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने बाजी मारली आहे. या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत अंतिम नामांकन मिळवले आहे. यामध्ये संगीत एमएम कीरावानी यांनी दिले असून गीते चंद्रबोस यांनी दिली आहेत. 

विशेष म्हणजे 'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब अवॉर्डही जिंकला आहे आणि त्याआधी क्रिटिक चॉईस अवॉर्डही जिंकला आहे. थोडक्यात या गाण्याने प्रेक्षकांसहीत क्रिटीक्सची मनेही जिंकली आहेत

ऑस्करच्या अंतिम नामांकनात स्थान मिळवल्यानंतर, आरआरआर चित्रपटाच्या टीमने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे, 'आम्ही इतिहास घडवला आहे!!! #NaatuNaatu ला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे हे सांगताना अभिमान वाटतो.

ही केवळ साऊथच्या सिनेमांसाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या गाण्याने ऑस्कर जिंकला तर दिर्घकाळानंतर देशातले संगीत नव्याने जगास 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT