Rakhi Sawant
Rakhi Sawant Dainik Gomantak

Rakhi Sawant Video : "माझ्या कबरीवर येशील का"? राखी सावंतच्या आयुष्यातलं दु:ख काही संपेना

राखी सावंतला सगळे ड्रामा क्विन म्हणतात ;पण राखीचं दु:ख सध्या संपता संपत नाही असंच म्हणावं लागेल
Published on

राखी सावंत पुन्हा एकदा अस्वस्थ झाली आहे. तिचं दु:ख तिने आता पापाराझीना सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा पापाराझी राखी सावंतला पाहते तेव्हा ती आनंदाने भेटते आणि तिचे सर्व सुख-दु:ख सांगते. पण सध्या ती खूप वाईट टप्प्यातून जात आहे. एकीकडे राखीची आई रुग्णालयात कॅन्सरशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

काही दिवसांपूर्वी तिच्या आदिल दुर्राणीसोबतच्या लग्नावरून बराच गदारोळ झाला होता. अशा परिस्थितीत, जेव्हा पापाराझीने राखीला पाहिले तेव्हा तो तिच्याशी बोलण्यासाठी पोहोचला. पण राखीला राग आला आणि मग ती रडत आपल्या भावना व्यक्त करु लागली.

मिडीया आणि पापाराझीना पाहुन राखीच्या भावना अनावर होतात. कॅमेरा दिसला की तिला रडु फुटतं. कॅमेऱ्याचं आणि राखीचं नातं सगळ्यांना माहित आहेच. आताही राखी कॅमेऱ्यासमोर आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.

पापाराझींना पाहून तिने जे सांगितले त्यात राखी सावंतचा राग स्पष्ट दिसत होता. पण नंतर तिच्या परिस्थितीमुळे आणि असहायतेमुळे ती रडली. राखीच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर स्पष्ट दिसत होत्या. पापाराजींनीही राखी सावंतची समजूत काढण्यास सुरुवात केली.

Rakhi Sawant
Theater Commands: थिएटर कमांड तयार करण्याच्या बहुप्रतिक्षित प्रस्तावावर पुन्हा एकदा चर्चा सुरू

राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पापाराझींना पाहताच राखी त्यांना म्हणाली, 'माझ्या मृत्यूच्या दिवशी तुम्ही माझ्या कबरीवर याल का? माझी अवस्था कशी आहे हे तुला माहीत नाही. माहित नाही, काय होईल.

 हे ऐकून सर्व पापाराझी राखीला शांत होण्यास सांगतात आणि तिला अशा गोष्टी बोलु नकोस असे सांगतात. राखीचे सांत्वन करताना एका पापाराझीने असेही सांगितले की, तुम्ही हजारो वर्षे जगू शकता.  हे बाोलणं ऐकुन राखी तिथुन निघुन गेली. आता राखीचं एवढं मोठं दु:ख तिचे फॅन्स समजावुन घेतात का? पाहुया

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com