Hrithik Roshan Dainik Gomantak
मनोरंजन

करण जोहरच्या पार्टीला रोमँटिक कपल हृतिक रोशन-सबा आझादची हजेरी; फोटो झाले व्हायरल

करण जोहरच्या पार्टीत हृतिक आणि सबा अतिशय रोमँटिक अंदाजात दिसून आले.

दैनिक गोमन्तक

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) हे बॉलिवूडचे हॉट आणि आनंदी कपल आहेत. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये सर्वत्र रंगत आहेत. अशा परिस्थितीत दोघेही आपल्या प्रेमाच्या रंगात संपूर्ण मुंबई शहर रंगवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. करण जोहरच्या (Karan Johar) पार्टीत हृतिक आणि सबा अतिशय रोमँटिक अंदाजात दिसून आले. (Romantic couple Hrithik Roshan Saba Azad attends Karan Johar party The photo went viral)

करण जोहरने 25 मे रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी अनेक मोठे आणि प्रसिद्ध स्टार्सनी उपस्थिती लावली होती. हृतिक रोशन आणि सबा आझाद या जोडप्यानी करणच्या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

काळ्या पोशाखाचे ट्विनिंग करून, हृतिक आणि सबाने ग्रँड एन्ट्री घेतली आहे. येथे दोघेही आनंदाने हातात हात घालून पार्टीमध्ये फिरताना दिसून आले. इतकंच नाही तर दोघांनी पहिल्यांदाच फोटोमध्ये एकत्र पोजही दिल्या.

पोज देताना दोघेही एकमेकांकडे बघत आहेत. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटो पाहून चाहत्यांनी रिप्लाय केला आहे त्यावेळी ते म्हणतात की, त्यांनाही स्वतःला हृतिक जसा साबाकडे पाहतोय तसे पाहायचे आहे.

या जोडप्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साबा आणि हृतिक पार्टीच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसत आहेत. दोघेही प्रवेशद्वारावर तुषार कपूर, अयान मुखर्जी आणि इतर सेलिब्रिटींना भेटताना दिसून येत आहेत. हृतिक सगळ्यांना गर्लफ्रेंड सबाची ओळख करून देताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हृतिक आणि सबाचे चाहतेही खूश झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'ऋतिक एक जेंटलमॅन आहे. तो सबाची सर्वांशी ओळख करून देत आहे आणि तिला समान मानत आहे. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'ते दोघे एकत्र किती छान दिसत आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

SCROLL FOR NEXT