Alia Bhatt- Ranveer Singh Dainik Gomantak
मनोरंजन

'रोमांस, तक्रार और जुनून'! Rocky Aur Rani Ki Prem Kahani च्या टिझरवर चाहत्यांच्या उड्या

Alia Bhatt: प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

दैनिक गोमन्तक

Ranveer Singh: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंग आणि लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे.

काही सेंकदाच्या या टिझरनेन चाहते हा चित्रपट रिलिज होण्याची वाट पाहत आहेत. या टीझरमध्ये रणवीर- आलियाच्या प्रेमापासून ते अॅक्शन सीनपर्यत आणि शेवटी आलिया वधूच्या वेषात दिसून येत आहे. याबरोबरच चित्रपटाचा भव्य सेट पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

रणवीर आणि आलिया या दोघांमधील केमिस्ट्री जबरदस्त दिसत असून चित्रपटाची कहानीदेखील तितकच रोमांचक असेल अशी अपेक्षा चाहते करत आहेत. करण जौहर, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी ही टीझर सोशल मिडियावर शेअर केला आहे.

टीझर आऊट होण्याआधीच या तीघांनी टीझरची डेटची घोषणा केली होती. आम्ही लवकरच प्रेमाच्या सीझनमध्ये प्रवेश करत आहोत, उद्या रॉकी और रजनी की प्रेम कहानी या चित्रपटाचा टीझर आऊट होईल आणि 28 जुलैला थिएटरमध्ये चित्रपट रिलिज होणार असल्याची माहीती त्यांनी काल सोशल मिडियावर दिली होती.

करण जौहर दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर काही मिनिटातच व्हायरल झाला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी, रोनित रॉय, अर्जुन बिजलानी, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया दिसून येणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT