Rohit Shetty  Dainik Gomantak
मनोरंजन

'Cirkus' Review: यावर्षीचा सगळ्यात खराब चित्रपट.. रोहित शेट्टीच्या 'सर्कस'वर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट यावर्षीचा सर्वात चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडुन येत आहेत.

Rahul sadolikar

दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा बहुप्रतिक्षीत सर्कस हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला ;पण हा चित्रपट कोणत्याही प्रकारे प्रेक्षकांचं समाधान करु शकला नाही. काही प्रेक्षकांनी याला वर्षातला सर्वात वाईट चित्रपट असंही म्हटलं आहे.

रोहित शेट्टीच्या सर्कसचा ट्रेलर रिलीज झाल्यापासुन प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता होती ;पण शुक्रवारी रिलीज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात कमी पडला आहे.सलग सुपरहिट चित्रपट देण्याचा फॉर्म्युला अवगत असलेला रोहित शेट्टी या चित्रपटाच्या माध्यमातुन बऱ्याच काळाने कॉमेडीचा तडका घेऊन येणार असं वाटत होतं पण प्रेक्षकांची ही अपेक्षा फोल ठरली आहे.

सर्कस चित्रपटात अनेक कलाकार असतानाही चित्रपटावर नाखुशी व्यक्त केली जात आहे. 'सर्कस' मध्ये रणवीर सिंह, संजय मिश्रा, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, जॉनी लीवर आणि मुरलीसारखे मोठमोठे कॉमेडी स्टार्स आहेत.

एवढी तगडी स्टारकास्ट बघता असं वाटत होतं हा चित्रपट सुपरहिट ठरणार आणि वर्षाचा शेवट या चित्रपटाने गोड होणार पण सर्कस प्रेक्षकांच्या या अपेक्षा पुर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.

सर्कस पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर शेअर केल्या आहेत. काहींनी या चित्रपटाला खराब तर काहींनी वाईट चित्रपट असा सर्कसचा उल्लेख केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: खाण क्षेत्र सुधारणांसाठी गोव्याला 400 कोटी! मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार; राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ

Goa Crime: 'राज्यात गुन्‍हे कमी, चर्चा जास्त'! DGP आलोक कुमार यांचे निरीक्षण; गुन्‍हेगारीसंदर्भातील घटना Viral होत असल्याचा दावा

Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

SCROLL FOR NEXT